देव देश आणि धर्माची पालखी वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म - उद्धव ठाकरे

शिवसैनिक हा केवळ तुमची पालखी वाहत नाही म्हणून तो भ्रष्टाचारी झाला?
 उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेSaamTV

मुंबई : "तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर आज ना उद्या तुम्ही देखील मुख्यमंत्री झाला असता परंतु तुम्ही वचन मोडलं. मुख्यमंत्रीपद तुमच्या नशिबातच नव्हतं आणि मी हे पद जे स्वीकारला हे एका जबाबदारीने स्वीकारलेला आहे". असं म्हणतच माझ्या शिवसैनिकांचा Shivsainik जन्म फक्त तुमची पालखी वाहण्यासाठी झालेला नाही तर देव देश आणि धर्मासाठी देशप्रेमाची आणि राष्ट्रभक्तीची पालखी वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झाला असल्याच उद्धव ठाकरे Uddhav Thackeray आपल्या भाषणात म्हणाले. (Shiv Sainiks were born to carry the palanquin of patriotism)

"आमचं सरकार तोडण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मी आज देखील सांगतो हिंम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, पण तसं करूनही सरकार पडत नाही मग छापा काट्याचा खेळ खेळायचा छापा टाकायचा आणि काटा काढायचा अशी खेळी भाजपने केली असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

हो आम्ही पालखीचे भोई आहोत पण...

 उद्धव ठाकरे
ती मर्दाची लक्षण नाहीत, आणि हिंदुत्वाची तर नाहीच नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपवरती घणाघात !

शिवसैनिक हा केवळ तुमची पालखी वाहत नाही म्हणून तो भ्रष्टाचारी झाला? त्याच्या वरती आरोप करत आहात. असे प्रश्न विचारत ते पुढे म्हणाले "मागेही मी सांगितलं आणि आत्ताही सांगतोय, 'हो' आम्ही पालखीचे भोई आहोत, मात्र आम्हा राष्ट्रभक्तीचे देशभक्तीचे आणि हिंदुत्वाच्या पालखीचे भोई आहोत तुमची पालखी वाहणारे नव्हे. आमच्यासाठी मानाची पालखी आहे ती आमच्या भारत मातेचे आहे, देशप्रेमाची आहे. पण तुमच्या सारख्यांच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झालेला नाही तर देव देश आणि धर्मासाठी शिवसेनेचा जन्म झाला असल्याचही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले.

दोन्ही पोटनिवडणूक By-election झाल्या यामध्ये यांना स्वतःच्या पक्षाचा उमेदवार भेटला नाही. "उमेदवारीसाठी यांना उपरे लागतात आणि जगातला मोठा पक्ष आहे यांचा" असा टोला मारत हा मोठा पक्ष नव्हे प्लॅटफॉर्म Platform वरचा पक्ष आहे अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com