बदलापुरात शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकमेकांना भिडले

कोरोना लसीकरण केंद्रावरच शिवसेना आणि भाजपच्या BJP कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
बदलापुरात शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकमेकांना भिडले
बदलापुरात शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकमेकांना भिडलेSaam Tv

बदलापुर - कोरोना लसीकरण Corona Vaccination केंद्रावरच शिवसेना Shivsena आणि भाजपच्या BJP कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी बदलापूर Badlapur पालिकेच्या दुबे रुग्णालयात Hospital हा प्रकार घडला. हाणामारीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत CCTV कैद झाली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना लसीकरण केंद्रांवर राजकीय कार्यकर्ते वशिलेबाजी करत असल्याच्या तक्रारी बदलापुरात समोर आल्या होत्या . राजकीय पुढारी आणि नगरसेवक हे आपल्या प्रभागातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर वशिल्याने आत मध्ये प्रवेश देत होते. त्याच वादातून आज शिवसेनेचे पदाधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले.

हे देखील पहा -

एकीकडे लसीकरण सुरू असताना दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनमध्ये हाणामारी सुरू झाली होती. ही हाणामारी सोडण्यासाठी काही नागरिकांनी सुरक्षारक्षक देखील पुढे सरसावले, मात्र त्यांना आवरणं सुरक्षारक्षकांना देखील अवघड गेले. अक्षरशः खाली पाडून लाथाबुक्यांनी एकमेकांना तुडवण्यात आले.

बदलापुरात शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकमेकांना भिडले
24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा

या सगळ्यामुळे लसीकरण केंद्रावर काही काळ मोठा गदारोळ निर्माण झाला होता. हाणामारीचा हा सगळा प्रकार लसीकरण केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. अशा राडेबाज कार्यकर्त्यांमुळे राजकीय पक्षांची प्रतिमा मात्र मलीन झाली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत बदलापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com