कल्याण - डोंबिवलीत रस्त्याच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने

कल्याण - डोंबिवलीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. मनसे आमदार आणि भाजप आमदार यांच्यावर शिवसेनेने हल्लाबोल केला आहे.
कल्याण - डोंबिवलीत रस्त्याच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने
कल्याण - डोंबिवलीत रस्त्याच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामनेप्रदीप भणगे

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापू लागले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांवरून भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना आणि पालकमंत्री यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काल मनसे आमदार राजू पाटील यांनी खासदारांना टोला हाणला. आमदार म्हणाले की एमएमआरडीएने मंजूर केलेले रस्ते कुठल्या सालचे आहेत, त्याची माहिती काढा. ३६० कोटी मंजूर झाले आहेत. पण त्याच्या नुसत्या मंजुऱ्या येतात, त्याचे होर्डिंग लागतात, पण काम कधी सुरू होणार? आता याला शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेने डोंबिवलीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासा करत मनसे आणि भाजप आमदारांवर टीका केली. (shiv sena criticized to bjp and mns about credit of roads in kalyan dombivali)

हे देखील पहा -

डोंबिवली स्टेशन, सागाव, मानपाडा रस्त्यासाठी राज्य सरकारने खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे २७ कोटी रुपये मंजूर केल्यानंतर हे श्रेय आपलेच असल्याचा दावा करत डॉ. शिंदे यांच्यावर अनाठायी टीका करणारे आमदार राजू पाटील यांना 'आयत्या बिळावर नागोबा' बनण्याची वृत्ती सोडा, असा सणसणीत टोला शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी लगावला आहे. शिवसेना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना कोपर खळी मारत टीका केली. तसेच भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले आहेत.

मनसे आमदाराबाबत त्यांनी सांगितले की, रस्त्यांसाठी जी टेक्निकल प्रोसेस आहे त्यासाठी खासदारांनी एमएमआरडीएचे आयुक्तांसोबत बैठक घेऊन पूर्ण केली आणि निधी डोंबिवलीकरांसाठी आणि कल्याणकरांसाठी मंजूर करून आणला आहे. मानपाडा रोड साठी निधी मंजूर झालेला आहे आणि ही काम शंभर टक्के होईल. डोंबिवलीकरांच्या सेवेसाठी लवकरात लवकर सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काही लोक फक्त पाहणी करतात आणि त्यांचा फक्त पत्रव्यवहार करतात. आता पाहणी करणं एवढेच काम राहिलेले आहे. माझी तर त्यांना आपल्या मार्फत विनंती आहे की त्यांचं पाहणी आमदार म्हणून नाव ठेवलं पाहिजे. कारण ते फक्त पाहणी करतात याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही, प्रत्येक ठिकाणी पाहणी केली की काम होतं असं नाही.

कल्याण - डोंबिवलीत रस्त्याच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने
भाजपा-मनसे युती: भाजपला हवा राज्यात नवा भिडू

भाजप आमदार आणि तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चारशे बहात्तर कोटी आणले असे बोलले होते. मात्र फक्त त्यांनी नारळ फोडले. तुम्हाला सांगतो डोंबिवलीकरांचे दुर्दैव आहे. डोंबिवलीकरांना राज्यमंत्री सारख पद मिळालं होत, त्यानंतरही डोंबिवलीकरांची कामे झाली नाहीत. पण आता आशा पल्लवित झाल्या आहेत की यांच्यामार्फत ही चांगली कामे आणि डोंबिवलीकरांनासाठी निधी मंजूर होऊन काम होतील. तसेच मनसे आमदार पाटील यांच्यावर शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सुद्धा टीका केली. तसेच त्यांनी भाजप आमदार चव्हाण यांच्यावर टीका केली. म्हात्रे यांनी सांगितले की मानपाडा रोडसाठी ३३ कोटी रुपये मंजूर करुन घेतले. संपूर्ण मंजुऱ्या मिळून संपूर्ण स्थायी समितीची मंजुरीसाठी मी सभापती असताना आणि आमच्या अजेंड्यावर असताना देखील त्याच दिवशी तो मागे घेण्यात आला. सुनील जोशी यांच्याकडून मागे घ्यायला लावला, तेव्हा तत्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण होते.

 यावर आता मनसे आमदार राजू पाटील आणि जिल्हासंघटक हर्षद पाटील यांनी उत्तर दिले आहे. आमदार पाटील म्हणतात की लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधीनुसार विकेंद्रीकरण केलेले आहे उदा. खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य अगदी ग्रामपंचायत पर्यंत, प्रत्येकाला लोकप्रतिनिधीचा दर्जा देऊन अधिकार असतात, त्यामध्ये व्यापक रहायचे असते इथे खासदार मात्र आमदार, नगरसेवक, जिल्हापरिषद अगदी ग्रामपंचायत मधील कामामध्ये श्रेय घेण्यासाठी हस्तक्षेप करताना दिसतात, ही लाजिरवाणी बाब आहे. 6 विधानसभा मतदारसंघ असलेल्या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय दर्जाचे प्रकल्प आणून विकासासोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे होताना दिसत नाही.

एवढी वर्षे सत्तेत असतानाही श्रेयासाठी इतर लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करून श्रेय घेणे शोभादायक नाही. विधानसभा बजेट मध्ये जी सार्वजनिक बांधकाम खात्यातील रस्ते मंजूर होतात ती मुख्यत्वे स्थानिक आमदारांच्या शिफारशीने होतात, कारण आमदार विधानसभेत नेतृत्व करीत असतात आणि संसदेत मंजूर होणारी कामे खासदार सुचवत असतात. त्यामुळे इतरांच्या कामात हस्तक्षेप करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, पदाच्या मर्यादा ठेवाव्यात, खासदरकीवरून खाली येऊ नये, वरच्या पायऱ्या चढाव्यात, बाकी शुभेच्छा.

कल्याण - डोंबिवलीत रस्त्याच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने
मांडवीत रिसॉर्टमध्ये छमछम, छाप्यात १६ बारबालांसह ३१ अटकेत

तर जिल्हासंघटक हर्षद पाटील यांनी सांगितले की खरंतर काय प्रतिक्रिया देणार, ते वैयक्तिक मत मांडू शकतात, बोलणारे धनी आहेत आणि राहिला विषय पाहणी करण्याचा ते तर आम्ही पुढच्या मानकोली ब्रिज आणि अॅप्रोच रोड याची देखील पाहणी करणार आहोत, तेव्हा बघूया काय होतं ते. सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे आज देखील सत्ताधारी पक्षाला पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागतंय आम्ही केलय म्हणून. पंचवीस वर्षे झाली सत्ता त्यांच्याकडे खासदार त्यांचे ते सरकारमध्ये आहेत. तरीसुद्धा सांगावं लागतं खरं तर त्यांनी करून दाखवायला पाहिजे होतं मला वाटत नाही याच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य आहे करून काय होतं माहिती आमचा राजू दादा काम करतोय जनता यांना दाखवेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com