Shivsena : दसरा मेळावा शिवाजी पार्कातच! शिवसेनेच्या बैठकीत निर्धार

Shivsena Dussehra Melava: शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
Shivsena Dussehra Melava
Shivsena Dussehra MelavaSaam Tv

मुंबई: शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा हा शिवाजी पार्कातच होणार असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. शिवसेना भवन येथे आज शिवसैनिकांची बैठक झाली होती. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी दसरा मेळावा शिवाजी पार्कातच घेणार असल्याचा निर्धार केला आहे. शिवसेना आमदार सुनिल प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. (Shivsena Latest News)

Shivsena Dussehra Melava
Amravati: पंतप्रधान मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा; युवक कॉंग्रेसने पकोडे विकून केला निषेध

शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे प्रत्येक वर्षाच्या दसऱ्याला मुंबईच्या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) शिवसेनाप्रमुख हे सभा घेत शिवसैनिकांना संबोधीत करत असतात. परंतु शिवसेनेत फूट पडल्यानंतपर एकेकाळचे कट्टर शिवसैनिक आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. तसेच आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचाही दावा केला. तेव्हापासून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचा गट असे दोन तुकडे शिवसेना पक्षाचे झाले आहेत. यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दसरा मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे.

याबाबत उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेनेचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होणार असा निर्धार करण्यात आला. येत्या २१ सप्टेंबरला हा दसरा मेळावा होणार आहे, त्यासाठीची ही आढावा बैठक होती. या बैठकीत मुंबईतील उपविभागप्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीबाबत आमदार सुनिल प्रभू म्हणाले की, पक्षप्रमुख नेहमी पदाधिकाऱ्यांशी बोलत असतात. आमची अनेक वर्षांची परंपरा आहे, त्यामुळे काहीही झालं तरी दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार, इतर कोणत्याही जागेचा विचार सुरू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Shivsena Dussehra Melava
Sharad Pawar: सर्वसामान्यांना शिक्षण मिळू नये असं सत्ताधाऱ्यांचं धोरण; 'गृहपाठ'वरून शरद पवारांनी घेतली 'शाळा'

वेदांता-फॉक्सकॉनवरुन राज्य सरकारवर टीका

शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेदांता आणि फॉक्सकॅान सारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्य सरकारवर टीका केली आहे. गुजरात लहान भाऊ आहे, त्यांच्याकडे प्रकल्प गेला. पण राज्य सरकार काय करत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या त्या वत्तव्याचा समाचार घेतला आहे. तसेच राज्य सरकारच्या अपयशाचं खापर आमच्यावर का फोडले जातंय असा सावलही त्यांनी उपस्थित केला.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com