इलेक्टोरल बॉंड्समधून शिवसेनेची कमाई, शिवसेना दुसरा श्रीमंत प्रादेशिक पक्ष (पहा व्हिडिओ)

राजकीय पक्षांना देणगी देण्याकरिता व्यक्ती, संस्था आणि संघटनांद्वारे निवडणूक रोखे इलेक्टोरल बॉन्ड वापरले जात आहेत
इलेक्टोरल बॉंड्समधून शिवसेनेची कमाई, शिवसेना दुसरा श्रीमंत प्रादेशिक पक्ष (पहा व्हिडिओ)
इलेक्टोरल बॉंड्समधून शिवसेनेची कमाई, शिवसेना दुसरा श्रीमंत प्रादेशिक पक्ष (पहा व्हिडिओ)Saam Tv

मुंबई : राजकीय पक्षांना देणगी देण्याकरिता व्यक्ती, संस्था आणि संघटनांद्वारे निवडणूक रोखे इलेक्टोरल बॉन्ड वापरले जात आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स एडीआर याच्या मते, शिवसेना, आप, द्रमुक आणि जेडीयूसह चौदा प्रादेशिक पक्षांनी 2019-20 मध्ये 447.49 कोटी रुपयांची देणगी निवडणूक बॉण्डसोबत प्राप्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही रक्कम या पक्षांच्या उत्पन्नाच्या 50.97 टक्के इतकी झाली आहे.

पोल राइट ग्रुपने दिलेल्या अहवालानुसार, 2019-20 मध्ये देशभरात 42 प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न 877.957 कोटी रुपये होते. मिळालेल्या अहवालानुसार, टीआरएस, टीडीपी, वायएसआर-सी, बीजेडी, डीएमके, शिवसेना, आप, जेडीयू, सपा, जेडीएस, एसएडी, एआयएडीएमके, आरजेडी आणि जेएमए या 14 पक्षांची निवडणूक रोख्यांमधून देणगी जाहीर करण्यात आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने 2019-20 या काळात इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमामधून कोणत्या प्रादेशिक पक्षाला किती प्रमाणात निधी मिळणार आहे, याची विषयी माहिती देण्यात आली आहे.

पहा व्हिडिओ-

प्रादेशिक पक्षात सर्वाधिक देणगी मिळालेल्या यादीत शिवसेनेचा दुसरा क्रमांक लागला आहे. तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये, टीआरएस 130.46 कोटी रुपयांच्या उत्पन्नासह अव्वल झाला आहे. ही रक्कम सर्व पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या 14.86 टक्के इतकी आहे. शिवसेना या पक्षाला111.403 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर वायएसआर- काँग्रेसने 92.739 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात आले आहे.

2019-20 या वर्षात विक्री करण्यात आलेल्या इलेक्टोरल बॉन्डच्या एक तृतीयांश निधीवर भाजपा मिळाला आहे. 2019-20 या वर्षाकरिता इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमामधून मिळालेल्या निधीपैकी तब्बल 74 टक्के निधी फक्त भाजपला मिळाला आहे. तर केवळ 9 टक्के निधी हा काँग्रेसला मिळालेला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेल्या माहिती आधारावर ही संपूर्ण माहिती समोर आली आहे.

इलेक्टोरल बॉंड्समधून शिवसेनेची कमाई, शिवसेना दुसरा श्रीमंत प्रादेशिक पक्ष (पहा व्हिडिओ)
संतापजनक: दहिसरमध्ये वारकरी शिल्पांची तोडफोड, पोलिसांनी आरोपींची उतरवली मस्ती

2019-20 या काळात एकूण विक्री झालेल्या 3427 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉन्डपैकी भाजपाला 74 टक्के म्हणजे 2555 कोटी रुपये निधी मिळवता आला आहे. 2017-18 या वर्षात भाजपला 71 टक्के निधी इलेक्टोरल बॉन्डमधून निधी मिळालेला होता. यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तो 74 टक्क्यावर पोहोचला आहे. सन 2017-18 साली भाजपाला 210 कोटी रुपये मिळाले होते. त्यात आता तब्बल दहा पटीने वाढ करून 2555 कोटी रुपये मिळाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.