Breaking: एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवले

शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई केली आहे.
Eknath Shinde latest News in Marathi, Political Crisis in Maharashtra
Eknath Shinde latest News in Marathi, Political Crisis in Maharashtra SAAM TV

मुंबई : शिवसेनेने (Shivsena) एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. शिवसेनेने आता अजय चौधरी यांना गटनेते पद दिले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण (maharashtra politics) आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) हे सेनेच्या (shivsena) सुमारे 17 आमदारांसह सूरतला (Eknath Shinde in Surat) गेल्याचे समजते. (Eknath Shinde Marathi news)

दरम्यान महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील (Gujarat BJP chief C R Patil) यांच्याशी संपर्कात हाेते असेही समजते.

Eknath Shinde latest News in Marathi, Political Crisis in Maharashtra
एकनाथ शिंदे आणि 'ऑपरेशन लोटस'मागे भाजपच्या महाराष्ट्राच्या या नेत्याचा हात?

एकीकडे शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना प्रस्ताव पाठवला आहे, तर दुसरीकडे शिंदे यांच्यावर कारवाई केली आहे. शिवसेनेचे काही नेते सूरतला शिंदे यांना भेटण्यासाठी गेले असल्याची माहिती मिळत आहे.

शिंदे हे गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये तळ ठोकून असल्याचे समजते. हॉटेलमध्ये ते आहेत त्याच्या बाहेर मोठा पोलीस (police) बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनधिकृत व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते, असा दावा राजकीय वर्तुळातून केला जात आहे. एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि त्यांच्या समवेत असलेले अन्य आमदारांना गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील यांनी मदत केल्याची समजते. पाटील आणि शिंदे दे दाेघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समजते.

गुजरात भाजपचे अध्यक्ष सी आर पाटील हेच सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामाेडींच्या पाठीशी असल्याचे समजते. पाटील हे मराठा समाजातील आहेत. त्यांचे जळगाव जिल्ह्याशी घट्ट नाते आहे. तसेच भाजपच्या केंद्रीय स्तरावर त्यांचे दाेन व्यक्तीशी निकटचे संबंध आहेत. दरम्यान पाटील हे सध्या गांधीनगरमध्ये आहे. त्यांनी आमदार सुरतला आल्याचे मला समजले असे एका वृत्तवाहिनीशी बाेलताना स्पष्ट केले. पाटील यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला. (Eknath Shinde Marathi news)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com