केंद्रीय तपास यंत्रणांना शिवसेनेकडून धमक्या; किरीट सोमय्यांचा आरोप

धमक्या संबंधी माझ्याकडे पुरावे असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांना शिवसेनेकडून धमक्या; किरीट सोमय्यांचा आरोप
Kirit SomaiyaSaam TV

मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. शिवसेनेच्या यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर खात्याने कारवाई सुरु केली आहे. यावरुन आता भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेवर केला आहे.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : राणांच्या जेलचा अनुभव ऐकला ,इंग्रजांच्या जेलची आठवण झाली - किरीट सोमय्या

'मी यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या प्रकरणचा पाठपुरावा करण्यासाठी गेलो होतो. तेव्हा मला अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या जात असल्याची माहिती दिली. तुमची मुलं कोणत्या शाळेत शिकतात अशी धमकी शिवसेनेकडून केंद्रीय यंत्रणांच्या तपास अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. तसेच या संबंधी माझ्याकडे पुरावे असल्याचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या माझगाव मधील घरी ही कारवाई झाली होती. याशिवाय त्यांच्या निकटवर्तीयाच्या घरी देखील आयकर विभागाने छापा टाकला होता. मुंबई महापालिकेच्या काही कंत्राटदारांवर आयकर विभागाने छापा टाकून कारवाई केली आहे. जानेवारी महिन्यामध्ये भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

दोन वर्षात यशवंत जाधव यांच्याकडून ३६ मालमत्ता खरेदी - किरीट सोमय्या

ट्विट करत किरीट सोमय्य यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केले होते. शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत यांनी २४ महिन्यात मुंबईत १००० घर/दुकान/गाळे असलेल्या ३६ बिल्डिंग ( जुन्या पघडीचा इमारती) विकत घेतल्या. १००० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. ED, कंपनी मंत्रालय, आयकर विभागद्वारा तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा असं ट्वीट सोमय्यांनी केलं होतं.

कोणत्या वर्षात किती मालमत्ता खरेदी ?

2020 - 07

2021 - 24

मार्च 2020 - 1

डिसेंबर 2020 - 2

जानेवारी 2021 - 3

फेब्रुवारी 2021 - 2

मार्च 2021 - 5

मे 2021 - 1

जून 2021 - 2

जुलै 2021 - 6

ऑगस्ट 2021 - 2

डिसेंबर 2021 - 3

Edited By - Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.