Shivsena: पुनश्च "उठा" या आशयाचे शिवसेनेचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल

कल्याण मतदार संघाच्या संपर्क प्रमुखपदी माजी आमदार सुभाष भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ShivSena Latest News
ShivSena Latest NewsSaam Tv

प्रदीप भनगे

डोंबिवली : शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठे बदल केले असल्याचे दिसत आहे. ठाणे-कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांचे एकमेकांचे पटत नव्हते, त्यामुळे भोईर गेल्या काही वर्षापासून शांततेच्या भूमिकेत होते. पण आता शिंदे यांच्या बंडखेरीनंतर भोईर शिवसेनेत पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहेत.

शिवसेनेचे (ShivSena) माजी आमदार सुभाष भोईर हे आता पुन्हा चर्चेत आले आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी माजी आमदार सुभाष भोईर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी कल्याण लोकसभा मतदार संघ पिंजून काढला तर शिवसैनिकांना आधार दिला. ठाणे जिल्ह्यात आता शिवसेनेचे नेते म्हणून सुभाष भोईर यांच्याकडे पाहू लागले आहेत. त्यातच आता भोईर यांचा पुनश्च "उठा" असा संदेश असलेला बॅनर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल व्हायला लागला आहे. विशेष म्हणजे बॅनरवर लोकनेते स्व.दी.बा. पाटील यांचासुद्धा फोटो आहे. त्यामुळे भूमिपुत्रामध्ये याची चर्चा होऊ लागली आहे.

ShivSena Latest News
Weight loss tips : वजन कमी करायचे आहे? कोणत्या सलादचा आहारात समावेश करायला हवा? जाणून घ्या

काय आहे बॅनरवर...

बॅनरवर शिवसेना (ShivSena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या असून, पुनश्च "उठा" आपण बाळासाहेबांची सावली हिंदुहृदयसम्राटांच रक्त... सर्वसामन्यांच्या प्रेमाचे आसक्त तरीही योग्यासमान विरक्त... धीरगंभीर अन् कणखर न होई विचलित क्षणभर इतकी पातळ नाही शिवसेना तमाम हिंदू मने मनापासून आपल्याच पाठीशी आहे.

संपर्क प्रमुखपदी माजी आमदार सुभाष भोईर यांची नियुक्ती

ठाणे जिल्ह्याची धुरा ही भोईर यांच्या खांद्यावर जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी माजी आमदार सुभाष भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

ShivSena Latest News
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस रात्री १२ वाजता केक कापून साजरा; Video व्हायरल

एकनाथ शिंदे आणि सुभाष भोईर यांचे फारसे पटत नाही

एकनाथ शिंदे आणि सुभाष भोईर यांचे फारसे पटत नसल्याने भोईर गेल्या काही वर्षांपासून शांततेच्या भूमिकेत होते. ते पक्ष सोडतील अशी देखील चर्चा होती. मात्र राजकीय वारे बदलताच भोईर जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे दिसत आहे. "मी आहे तिथेच आहे आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सोबतच आहे" असे स्पष्ट करत शिवसेनेचे (ShivSena) कल्याण ग्रामीणचे माजी आमदार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष भोईर यांनी आपले समर्थन उद्धव ठाकरे यांना जाहीर केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com