ओबीसी आक्रमक चेहरा करणार शिनसेनेत प्रवेश; आज बांधणार शिवबंधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे,.
uddhav Thackeray
uddhav Thackeray saam tv

पुणे: शिवसेनेत बंडामुळे शिवसेनेत (ShivSena) उभी फूट पडली आहे. एकीकडे शिवसेनेतील आमदारांनी बंड केले आहे, तर दुसरीकडे आता शिवसेनेत महाराष्ट्र राज्य मागास आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राज्यात लक्ष्मण हाके धनगर समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. हाके आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत.

शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे, या पार्श्वभूमिवर राज्यभरातील नगरसेवक तसेच आमदार, खासदार शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करत आहेत. या पार्श्वभूमिवर आता शिवसेनेतही इनकमींग सुरू झाले आहे. (Shiv Sena Latest News)

uddhav Thackeray
'या गद्दारांना लोक...'; उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

शिवसेनेतील (ShivSena) फुटीनंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यभरात दौरा सुरू केला आहे. ठाकरे यांच्या दौऱ्याला राज्यात चांगली प्रतिसाद मिळत आहे. काल पुण्यात झालेल्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेत पुन्हा मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

आंबेडकरवादी नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना शिवसेनेचे उपनेते पद देखील देण्यात आले होते. आता ओबीसी चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेले लक्ष्मण हाके हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता शिवसेनेत इनकमींन वाढले असल्याचे बोलले जात आहे.

uddhav Thackeray
गणपती मंडळांसाठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? शहाजीबापू पाटील म्हणाले...

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा गट तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता दोन्हीकडून आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

शिवसेनेचे याचिकांवर ८ ऑगस्ट रोजी सुनवाणी होणार आहे. या सुनावणीत आमदारांवर कारवाई होणार का याचा निर्णय होणार आहे. याअगोदर आता शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कोमाला मिळणार याच्या चर्चा सुरू आहेत. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दुसरे चिन्ह सुचवले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com