आमदार पाठवले तसा प्रकल्प तिकडे पाठवायचा का? आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांना सवाल

आदित्य ठाकरे यांनी वेदांता प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
aaditya Thackeray and devendra Fadnavis
aaditya Thackeray and devendra Fadnavis saam tv

निवृत्ती बाबर

Aaditya Thackeray News : 'वेदांता-फॉक्सकॉन' प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. राज्य सरकारला या मुद्यावरुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे. तर 'वेदांता-फॉक्सकॉन' प्रकल्प जाण्याचं खापर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर फोडलं आहे. याचदरम्यान, आदित्य ठाकरे यांनी वेदांता प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार पाठवले तसा प्रकल्प तिकडे पाठवायचा का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

aaditya Thackeray and devendra Fadnavis
Breaking : ऑक्टोबरमध्ये PM नरेंद्र मोदी मुंबई-ठाणे दौऱ्यावर?

आदित्य ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांच्याकडून भाषणात शिंदे गट आणि भाजप यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आज, शुक्रवारी कोकणातील दापोली येथे शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. भाषणानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली.

'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कदाचित गुजरातची जबाबदारी मिळाली असेल. प्रकल्प गुजरातला जाणं हे माझं दु:ख नाही, जो प्रकल्प १०० टक्के महाराष्ट्रात येणार होता, तो प्रकल्प आला नाही. पहिला हट्ट महाराष्ट्राचा धरला पाहिजे. आमदार पाठवले तसा प्रकल्प तिकडे पाठवायचा का ?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना केला.

aaditya Thackeray and devendra Fadnavis
आदित्य ठाकरेंनी दिले नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले, 'काही लोकांवर...'

कोकणातील रिफायनीरीवर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं. आदित्य ठाकरे म्हणाले, 'रिफायनरीबद्दल मी अनेक वेळा बोललो आह. राजापूरमध्ये विरोध झाला आपण बाहेर गेलो. ज्यांचा विरोध हे त्यांच्यासोबत बसून चर्चा करायला हवी. काय इम्पॅक्ट होईल याचं सादरीकरण केलं पाहिजे. जनता जिकडे असेल, तिकडे आम्ही असणार आहे. ५० टक्के विरोध ५० टक्के समर्थन झालेलं आहे. यातून तोडगा काढायचा असेल, तर त्याचं सादरीकरण लोकांना द्यावं'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com