Aaditya Thackeray : मुंबई महापालिकेच्या ८० हजार कोटींच्या एफडीवर भाजपचा डोळा; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray saam tv

Aaditya Thackeray News : मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजपचा मुंबईकरांच्या पैशांवर म्हणजेच महापालिकेतील ८० हजार कोटींच्या एफडीवर डोळा असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही, तर ज्या-ज्या महापालिकेत भाजपची सत्ता होती ती महापालिका तोट्यात असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.  (Maharashtra Political News)

Aaditya Thackeray
Maharashtra Politics : शिवसेना कुणाची? आता 30 जानेवारीला होणार फैसला! आज काय घडलं?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज मुंबई माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीत आमचाच विजय होणार असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

भाजपला मुंबई महापालिकेत (BMC) सत्ता हवी आहे, कारण त्यांचा मुंबईकरांच्या पैशांवर म्हणजेच मुंबई महापालिकेच्या ८० हजार कोटींच्या एफडीवर डोळा आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील सभेत निघाला होता असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

Aaditya Thackeray
Uday Samant : थरारक घटना! उद्योग मंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले; भर समुद्रात अचानक बंद पडली बोट

याशिवाय ज्या-ज्या महापालिकेत भाजपची सत्ता होती. मग ते नागपूर असो वा ठाणे महापालिका असो तिथे महापालिका फायद्यात नाही तर तोट्यात आहे. त्यामुळे त्यांना राज्य सरकारकडे सातत्याने पैशांची मागणी करावी लागते, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. मुंबईत आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही महापालिकेला फायद्यात आणली, असंही ते म्हणाले.

'निवडणूक आयोगासमोर विजय आमचाच होईल'

निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला पुन्हा पुढची तारीख मिळाल्यावरून बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, विजय आमचाच होणार, विजय सत्याचाच होतो. महत्वाचा प्रश्न हा आहे की, किती दिवस हा विषय आपण प्रलंबित ठेवणार आहोत. किती दिवस पुढची तारीख करत राहाणार आहोत? देशातील कायदा संविधानाचा अनादर करून असं सरकार बसू शकतं का आणि एका राज्याला स्वतःच्या महत्वकाक्षेसाठी मागं नेऊ शकतं का? हा विचार समोरच्या पक्षाने करण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com