आंदोलन का करताय ते अगोदर ठरवा; मनसेच्या आंदोलनावर संजय राऊतांची टीका

ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं त्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
आंदोलन का करताय ते अगोदर ठरवा; मनसेच्या आंदोलनावर संजय राऊतांची टीका
Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Raut on MNS agitation, Sanjay Raut Latest Marathi NewsSaam Tv

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसैनिकांना केले होते. त्यानंतर आज अनेक मशिदींमध्ये (Masjid) सकाळची अजान ही भोंग्याविना झाली. मनसेच्या भोंगा आंदोलनावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली. आंदोलन का करताय ते अगोदर ठरवा. महाराष्ट्रात नियमानुसारच भोंगे आहेत. मला तर आंदोलन कुठेच दिसत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी मनसेवर केली. (Sanjay Raut on MNS agitation)

मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यासाठी आंदोलन करावे अशी परिस्थिती सध्या नाही. मुंबईत सर्वांनी परवानगी घेतली आहे. आता महाराष्ट्रात भोंग्याविषयी सुरु असलेल्या परिस्थितीची पंतपधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गंभीर दखल घेणे गरजेचं आहे, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Raut on MNS agitation, Sanjay Raut Latest Marathi News
Hingoli: अजान देताना भाेंग्याचा आवाज कमी ठेवण्यात आला; 'मनसे' ची आज महाआरती

राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या व्हिडिओवर बोलताना राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी कधीच सर्व भोंगे उतरवा असं म्हटलेलं नाही. शिवसेनेला (Shivsena) कोणीही हिंदुत्व शिकवू नये. भजन, किर्तनाचे भोंगे बंद करायचे का, असा सवालही राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

कुणाच्याही अल्टिमेटमवर सरकार चालणार नाही. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राविरोधी कारवाई केली त्यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला. ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं त्यांनी शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. शिवसेनेला कुणीही बाळासाहेब शिकवू नये, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.