Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याआधीच ठाकरेंची तोफ धडाडणार; गोरेगावात आज शिवसेनेचा मेळावा

दसरा मेळाव्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

Uddhav Thackeray News Today : शिवाजी (Shivsena) पार्कवर दसरा मेळावा कुणाचा? यावरून सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आमचाच होईल, असं शिंदे गटातील (Eknath Shinde) नेते ठामपणे सांगताना दिसत आहे. अशातच दसरा मेळाव्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. (Shivsena Latest News)

Uddhav Thackeray
आमदाराकडं विमानतळावर सापडलं मोठं घबाड; नोटा मोजण्यासाठी मागवलं मशीन

आज म्हणजेच बुधवारी (२१ सप्टेंबर) गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे या मेळाव्याला उपस्थित राहणार असून शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. त्यामुळे पक्षाची आगामी भूमिका कशी असेल? शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.

या मेळाव्यासाठी सुमारे ३५००० जण मावतील असा मोठा हॉल बुक करण्यात आला आहे. यावेळी करत चलो गोरेगाव असा नारा देत शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होतील. मुंबईतील शिवसेना नेते, विभागप्रमुख,शिवसेना उपनेते, विधानसभा संघटक,विधानसभा समन्वयक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख आदी मुंबईचे सुमारे ३० ते ३५ हजार पुरुष व महिला पदाधिकारी यावेळी सहभागी होणार आहे. (Uddhav Thackeray Todays News)

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा?

दुसरीकडे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी कुणाला मिळणार, याचा पेच अद्यापही कायम आहे. आपल्यालाच परवानगी मिळावी यासाठी दोन्ही गटातील नेते आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलीस मुंबई पोलिस आणि गृहविभाग शिवाजी पार्क वर दसरा मेळावा घेण्याबाबत आपली भूमिका मांडणार आहे.

दोन्ही गटाला परवानगी न देण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर परवानगी न देण्याच्या हालचाली या दोन्ही विभागांकडून होणार आहेत. कुणालाच परवानगी ने देण्याची सूचना मुंबई पोलीस आणि गृहविभाग मुंबई पालिकेला करणार असल्याचे समजते.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com