Dombivli : डोंबिवलीत शिवसेना - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा !

शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी तुंबळ हाणामारी झाली.
Dombivli : डोंबिवलीत शिवसेना - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा !
Dombivli : डोंबिवलीत शिवसेना - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा !SaamTV

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी MIDC मिलापनगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून आज दुपारी शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ShivSena and NCP workers आपापसात भिडले. शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये Manpada Police Station दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले आहेत. (Shiv Sena NCP workers clashed)

रस्त्यावरील निकृष्ट दर्जाचं काम चालू  असल्याने त्याचा जाब विचारला असता शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तेजस पाटील यांनी केली आहे.

Dombivli : डोंबिवलीत शिवसेना - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा !
'कोल्ह्याला द्राक्ष आंबट' चित्रा वाघ यांना खोचक टोला !

तर याबाबत युवा सेनेचे जिल्हा समन्वयक योगेश म्हात्रे यांनी सांगितले की रस्त्याचे काम सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला आम्ही त्यांना महापालिकेत जाऊन विचारा असं सांगितलं त्याचाच राग येऊन त्यांनी वाद घालत आम्हाला मारहाण केल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या आपापसातील वादामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.