पिंपरी-चिंचवडच्या महापौरांच्या जलपूजनाला शिवसेनेचा विरोध

गेल्या आठवड्यात खासदार श्रीरंग बारणे यांनी जलपूजन केले. खासदारांच्या जल पूजनावरून पिंपरी-चिंचवड शहर भाजपाने खासदारांवर जोरदार टीका केली.
पिंपरी-चिंचवडच्या महापौरांच्या जलपूजनाला शिवसेनेचा विरोध
पिंपरी-चिंचवडच्या महापौरांच्या जलपूजनाला शिवसेनेचा विरोधदिलीप कांबळे

मावळ: पवना धरणातील पाणीसाठा 98% टक्‍क्‍यांहून अधिक आहे. गेल्या आठवड्यात खासदार श्रीरंग बारणे यांनी जलपूजन केले. खासदारांच्या जल पूजनावरून पिंपरी-चिंचवड शहर भाजपाने खासदारांवर जोरदार टीका केली. परंतु प्रत्यक्षात धरणग्रस्तांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्‍त करत महापौरांच्या जल पूजनाला कडाडून विरोध दर्शविला आहे. आज सकाळ पासूनच शिवसैनिकांनी पवना धरणावर मोर्चेबांधणी केली होती. मात्र पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी पवना धरणावर येणे टाळले. (Shiv Sena opposes water worship of Pimpri-Chinchwad mayor)

हे देखील पहा -

पवना धरणातून मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणामध्ये या भागातील सुमारे 22 गावांमधील जमिनी गेल्या आहेत. शासकीय आकडेवारीनुसार 1203 शेतकरी बाधित झाले आहे. यापैकी 340 शेतकऱ्यांना जमीन देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. उर्वरित 863 खातेदार गेल्या 55 वर्षांपासून यापासून वंचित आहे. शासन दरबारी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे, मोर्चे करून शासनाकडून पवना धरणग्रस्तांचा प्रश्‍न प्रलंबितच राहिला आहे. मागे खासदार श्रीरंग बारणे यांनी जलपूजन केल्यानंतर पिंपरी-चिंचवड भाजपाने त्यांच्यावर हल्लाबोल केला. या सर्व घटनेमुळे लोकप्रतिनिधींनी जलपूजनाला येऊ नये, अशी भूमिका धरणग्रस्तांनी घेतली आहे. प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावे या पाण्यावर महापालिकेला शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत आहे; परंतु पुनर्वसित गावच्या विकासासाठी एक रुपयाचा निधी उपलब्ध होत नसल्याने धरणग्रस्तांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या महापौरांच्या जलपूजनाला शिवसेनेचा विरोध
Breaking: सरपंचाला हाताशी धरून प्राध्यापकांनी लाटली 102 एकर जमीन!

महापौरांच्या पूजनाला विरोध असून, अन्य कोणत्याही लोकप्रतिनिधीने जलपूजनाचा आग्रह धरू नये असा इशारा पवना धरणग्रस्तांनी दिला आहे. पवना धरणग्रस्तांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा पवना धरणग्रस्तांनी घेतला आहे. 

धरणग्रस्तांच्या प्रमुख मागण्या:

– पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे

– पिंपरी-चिंचवड महापालिकेत धरणग्रस्तांना नोकरी द्यावी

– गाळे वाटपाचा मुद्दा

– पुनर्वसन गावे दत्तक घेतलेली नाहीत

– अन्य कोणत्याही विकास योजना नाही

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com