घरचे दरवाजे उघडे आहेत, का उगाच वणवण भटकताय?; संजय राऊतांचं ट्विट

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एक सूचक ट्विट केलं आहे.
घरचे दरवाजे उघडे आहेत, का उगाच वणवण भटकताय?; संजय राऊतांचं ट्विट
Sanjay Raut NewsSaam Tv

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. अशातच शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा एक सूचक ट्विट केलं आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत, का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. (Sanjay Raut Latest News)

Sanjay Raut News
साहेब काळजी करू नका, शिवसैनिक तुमच्या पाठीशी; फायर आजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे हे आता भाजपसोबत जाणार असल्याची माहिती आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठी ऑफर मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. राज्यात ८ कॅबिनेट मंत्रिपदे, तर केंद्रात २ मंत्रिपदे देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडूनही ऑफर दिली गेल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (Eknath Shinde Latest News)

अशातच बंड केलेल्या आमदारांना शिवसेनेकडून परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. विशेष बाब म्हणजे आज दुपारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी "भाजपने शिवसेनेच्या आमदारांना फसवून गुजरातला घेऊन गेले आहेत, भाजपने त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी सध्या कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले असले तरी त्यातील २१ आमदारांचा संपर्क झाला आहे. ते आमदार ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील", असं राऊतांनी म्हटलं होतं.

इतकंच नाही तर, आमदारांनी 24 तासांच्या आत मुंबईत यावं, आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करू असं आवाहन संजय राऊत यांनी शिंदे गटाला केलं आहे. "तुमचं म्हणणं आहे ना, आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करु, पुढच्या २४ तासांत बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं. तुमची अधिकृत भूमिका शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. तुमच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल", असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, आता चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत, का उगाच वणवण भटकताय? गुलामी पत्कारण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र! असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आवाहनाला मान देऊन गुवाहाटीवरून परत येतील का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com