जावेद अख्तर आणि संघाच्या सामन्यामध्ये, शिवसेना संघाच्या बाजूने...

शिवसेना आणि संघाचे हिंदुत्व व्यापक आहे, ते सर्वसमावेशक आहे.
जावेद अख्तर आणि संघाच्या सामन्यामध्ये, शिवसेना संघाच्या बाजूने...
जावेद अख्तर आणि संघाच्या सामन्यामध्ये, शिवसेना संघाच्या बाजूने...SaamTV

मुंबई : ‘तालिबानचे Taliban हे कृत्य रानटी असून ते निंदनीय आहे. त्याप्रमाणे RSS, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीची आहे, या विचारधारेचे समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,' असे वादग्रस्त मत ज्येष्ठ कवी आणि लेखक जावेद अख्तर Javed Akhtar यांनी व्यक्त केले होते. या वक्तव्यावरुन अनेक वाद निर्माण झाले भाजपच्या राम कदमांनी Ram Kadam जावेद अख्तरांना अटक करण्याची मागणी केली आहे, तर भाजपकडून अख्तरांच्या फोटोला काळ फासून चप्पला मारण्यात आल्या. संघ,भाजप विरोधी जावेद अख्तर असा सामना रंगला असतानाच सतत भाजपच्या विरोधात असणाऱ्या शिवसेनेने Shivsena मात्र आपल्या सामना वृत्तपत्रातून Samana newspaper संघाची बाजू घेऊन संघ आणि तालिबानची तुलना करणं अयोग्य असल्याच सामनाच्या अग्रलेखातून म्हटल आहे. Shiv Sena sided with RSS in the dispute between Javed Akhtar and RSS

हे देखील पहा-

जावेद अख्तर हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. या देशातील धर्मांधता, मुस्लिम Muslim समाजातील धर्मांध अतिरेकी विचार, राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून फटकून वागण्याचे धोरण अशा अनेक गोष्टींबद्दल जावेद यांनी सतत कठोर प्रहार केले आहेत. देशात जेव्हा-जेव्हा धर्मांध, राष्ट्रद्रोही विकृती उसळून आल्या त्या प्रत्येक वेळी अख्तर यांनी त्या धर्मांधांचे मुखवटे फाडले आहेत. धर्मांधांची पर्वा न करता त्यांनी ‘वंदे मातरम्’चे Vande Mataram गायण ही केले आहे. तरीही संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही,” असं सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

शिवसेना संघाचे हिंदुत्व व्यापक

दरम्यान शिवसेना आणि संघाचे हिंदुत्वHindutva व्यापक आहे, ते सर्वसमावेशक आहे. या हिंदुत्वामध्ये मानवी हक्क, व्यक्तिस्वातंत्र्य, महिलांचे हक्क अशा पुरोगामी Progressive विचारांना स्थान आहे. संघ किंवा शिवसेना तालिबानी विचारांचे असते तर या देशात तिहेरी तलाकविरुद्ध Tripple Divorce कायदे झाले नसते व लाखो मुसलमान महिलांना स्वातंत्र्याची किरणे दिसली नसती. असेही आजच्या सामनामध्ये लिहले आहे एकंदरीतच अनेक दिवसांनी सेनेने आपल्या अग्रलेखातून आपल्या हिंदुत्वाची व्यापक भुमिका काय आहे ती दाखविण्याचाही प्रयत्न केला आहे. तसेच संघ-सेना हिंदुत्वाच्या मुद्दयांबाबत एकच आहोत असही सेनेला आज आपल्या अग्रलेखातून स्पष्ट करावसं वाटलं आहे.

जावेद अख्तर आणि संघाच्या सामन्यामध्ये, शिवसेना संघाच्या बाजूने...
Buldana | 'राजेंद्र शिंगणेंचा आपल्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा अजब सल्ला'

ते लोकच तालिबानी

“कश्मीरातून ३७० कलम हटविले.Kashmir 370 त्यामुळे कश्मीरचा कोंडलेला श्वास मोकळा झाला आहे मात्र हा मोकळा झालेला श्वास पुन्हा बंद करा, अशी मागणी करणारे लोकच तालिबानी आहेत. कश्मिरी पंडितांची घरवापसी होणे गरजेचे आहे. त्यावर कोणाचेही मतभेद असता कामा नये असे परखड मत आज सामनामधून मांडण्यात आले आहे एकंदरीत जावेद अख्तर आणि संघाच्या सामन्यामध्ये शिवसेना संघाच्या बाजूने ठाम उभी आहे आणि अख्तर यांच्या त्या वक्तव्याशी ती सहमत नसल्याचे आजच्या सामनातील अग्रलेखातून दिसत आहे.

Edited By - Jagdish Patil

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com