लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आखली मोठी रणनीती; उद्धव ठाकरेंनी लावला बैठकांचा सपाटा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ४८ लोकसभा मतदार संघाच्या बैठका सुरू केल्या आहेत.
shivsena uddhav thackeray
shivsena uddhav thackeray saam tv

भूषण शिंदे

Shivsena Uddhav Thackeray News : भाजपने देशात २०२४ च्या लोकसभा निवडणकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रासाठी भाजपने मिशन ४५ सुरू केले आहे. त्यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देखील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ४८ लोकसभा मतदार संघाच्या बैठका सुरू केल्या आहेत, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार अंबादास दानवे यांनी दिली आहे.

shivsena uddhav thackeray
Raj Thackeray : राज ठाकरे पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हणाले की, मोठे प्रकल्प गुजरातला जात असतील तर...

विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दानवे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची लोकसभा निवडणुकीची रणनीती सांगितली. दानवे म्हणाले, 'शिवसेना (Shivsena) कधीही कोणत्याही लढ्याला तयार असते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ४८ लोकसभा मतदार संघाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. सर्व तालुका प्रमुख, माजी-आजी खासदार आमदार, जिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांची बैठक घेतल्या जाताहेत. संघटनात्मक व्यवहारचना याबाबत चर्चा होत आहे. प्रत्येक मतदार संघाचे वेगळे गणित आहे. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करतील'.

shivsena uddhav thackeray
Devendra Fadnavis : विरोधकांनी महाराष्ट्राची बदनामी केली; उपमुख्यमंत्री फडणवीस असे का म्हणाले ?

'कॅगने पुणे, नाशिक, नागपूर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका याची सुद्धा चौकशी करावी, फक्त मुंबईची नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या काळात नगरविकास मंत्री होते. त्यांच्या काळात कंत्राट देण्यात आले. मुख्यमंत्री यांना अडचणीत आणण्यासाठी तर भाजप हे करत नाही ?', असा सवाल करत दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला.

पोलीस सुरक्षा काढण्यावरून दानवे म्हणाले, 'मला वाटतं शिवसैनिकांना कुठल्याही सुरक्षाची गरज नाही. त्यांना सुरक्षा कमी करू द्या. निवडणुकीला सुद्धा शिवसेना घाबरत नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com