समझने वालों को इशारा काफी; एकनाथ शिंदेंच्या ट्विटवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रीया

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदार नॉटरिचेबल असल्याचे समोर आले आहे.
समझने वालों को इशारा काफी; एकनाथ शिंदेंच्या ट्विटवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रीया
Eknath ShindeSaam TV

मुंबई: राज्यसभा निवडणुकीनंतर (Election) विधान परिषद निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत उभी फूट पडल्याची दिसत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १७ आमदार नॉटरिचेबल असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारण ढवळून निघाले आहे. काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिलीच प्रतिक्रीया ट्विट करुन दिली आहे, या ट्विटर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही' अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Eknath Shinde
LIVE: आमच्या युतीत कोणताही फरक पडलेला नाही : शरद पवार

यावर बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, एकनाथ शिंदेना काय म्हणायचे हे मी काय सांगू समझने वालों को इशारा काफी हैं. शिंदेना कोणाला काय सांगायचे आहे, हे समजले आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होते. भाजपला ज्यांनी मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो.

शिवसेनेला त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही. रात्री १ वाजता तुम्ही हॉटेल बदलता. भाजपने एकनाथ शिंदेंना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, आम्हाला सर्व पक्षांनी मदत केली आहे. जी नाराजी आज शिवसेनेत व्यक्त झाली. उद्या अशी नाराजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होऊ शकते असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Eknath Shinde
आम्ही सत्तेसाठी कधीही…”; एकनाथ शिंदेंचं बंडानंतर पहिलं ट्विट

बंडानंतर एकनाथ शिंदे यांचे पहिले ट्विट

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण (maharashtra politics) आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) हे सेनेचे (shivsena) सुमारे १७ आमदारांसह सूरतला (Eknath Shinde in Surat) गेल्याचे समजते. दरम्यान महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. आता एकनाथ शिंदे यांनी पहिलीच प्रतिक्रीया ट्विट करुन दिली आहे.

'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही' अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. (Political crisis in Maharashtra)

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com