..पवार साहेबांना 'हे' माहीत नाही का? आढळरावांचा सवाल

.....तरी पवारसाहेब साहेबांना माहिती नाही का? असा प्रश्न शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी (Shivaji Adhalrao Patil) उपस्थित केला आहे.
..पवार साहेबांना 'हे' माहीत नाही का? आढळरावांचा सवाल
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटीलSaam Tv

पुणे: खेड तालुक्यात एअरपोर्ट तांत्रिक दृष्ट्या होणं शक्य नसल्याचे अहवाल तब्बल सहा वेळा कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Congress-NCP) सरकारच्या काळात दिले होते, तरी पवारसाहेब साहेबांना माहिती नाही का? असा प्रश्न शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी (Shivaji Adhalrao Patil) उपस्थित केला आहे.

कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसचे सरकार असताना एअरपोर्ट अथोरिटीने तब्बल सहा वेळा सर्वे करत खेड तालुक्यात तांत्रीक दृष्ट्या एअरपोर्ट होणं शक्य नसल्याचे अहवाल दिले डोंगराळ भाग,नदी,आणि जमिनींचे चढ उतार असलेली जमिन नसल्याने एअरपोर्ट खेड तालुक्यात होणं शक्य नसल्याचे स्पष्ट अहवाल त्यावेळच्या आघाडी सरकार दिले होते.

अशा पार्श्वभुमीवर पवार साहेब म्हणत असतील पुन्हा हा एअरपोर्ट खेडमध्ये आणू तर त्यांच्या या विधानाचे स्वागत आहे. मात्र कदाचित शरद पवारांना माहीत नसावे केंद्र आणि राज्याच्या दोन्ही एअरपोर्ट अथोरिटीने त्यांच्याच सरकारच्या काळात झालेल्या सर्वेच्या अहवालात खेड तालुक्यात एअरपोर्ट तांत्रिक दुृष्ट्या शक्य नसल्याचे सांगितले होते. तरी पवारसाहेब खेड तालुक्यात विमानतळ आणत असतील तर स्वागतच असं म्हणत आढळरावपाटीलांनी पवारसाहेबांवर बोचकी टिका केली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com