अमोल कोल्हेंच्या 'त्या' वक्तव्याचा शिवाजीराव पाटील यांनी घेतला समाचार

''राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत.'' असं वक्तव्य शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं.
अमोल कोल्हेंच्या 'त्या' वक्तव्याचा शिवाजीराव पाटील यांनी घेतला समाचार
अमोल कोल्हेंच्या 'त्या' वक्तव्याचा शिवाजीराव पाटील यांनी घेतला समाचाररोहिदास गाडगे

पुणे - ''राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत.'' असं वक्तव्य पुण्याच्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी घेतला आहे. shivajirao patil criticism to the MP amol kolhe for his comment on Cm uddhav thackeray

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री Cm uddhav thackeray पवारसाहेबांच्या sharad pawar आशिर्वादाने असल्याचे वक्तत्व करण्याची आपली उंची आहे का? असा सवाल त्यांनी अमोल कोल्हेंना केला. तसेच कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घ्यावा ही काय पद्धत आहे का, असं म्हणत खोचक टोलाही लगावला. पुढे ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमुळेच आघाडीतील बिघाडी सुरु झालीय. त्यातच बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी जाहीर वक्तव्यानंतर बिघाडीचं चित्र जाहीरपणे केलं गेलं. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र असताना बाह्यवळणाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांना डावललं अन् जाहीर कार्यक्रमात थेट मुख्यमंत्र्यांना खासदार कोल्हेंनी MP amol kolhe लक्ष केलं कोल्हेंनी स्वतःची लायकी दाखवली, त्यामुळे आपली उंची आणि लायकी पाहून वक्तव्य करावं, अशा कडक शब्दांत त्यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.

हे देखील पहा -

आज महाविकास आघाडीमधील mahavikas aaghadi सत्तेत तुम्हीसुद्धा सत्तेत सहभागी आहात. सत्तेची फळं सुद्धा तुम्ही चाखताय. या सत्तेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला NCP ही चांगली आणि महत्वाची पदे दिलीत हे सर्व शिवसेनेमुळंच असल्याचा दावा आम्ही सुद्धा करु शकतो, असं म्हणत आढळराव पाटलांनी shivajirao aadhalrao patill कोल्हेंच्या वादग्रस्त वक्तत्वाचा समाचार घेतला. आज तुम्ही खासदार असाल पण तुम्हाला शिवसेने आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला मोठं केलं, पदे दिली, मान सन्मान दिला त्याचे पांग असं बोलुन फेडता का? अशी विचारणा आढळराव यांनी केली.

अमोल कोल्हेंच्या 'त्या' वक्तव्याचा शिवाजीराव पाटील यांनी घेतला समाचार
पाच सदस्यीय समिती करणार 10च्या निकालाच्या क्रॅश वेबसाईटची चौकशी

मुख्यमंत्र्यांवर टिका करताना माझ्यावर खालच्या पातळीवर चालु टिका केली जाते. लबाड कोल्हा शिवसेनेतूनच shivsena मोठा झाला आणि आता त्याच शिवसेनेवरच बोलायचे हा माणसातील गुणधर्म आहे का? राजकारण खालच्या पातळीवर जाऊन, तरुण आणि म्हातारे असं समीकरण जोडुन, लोकांची दिशाभुल करुन, केले जातं आहे. मात्र मी म्हतारा जरी असतो तरी माझ्याकडे बुद्धीमता, समज आहे. मी यांच्यासारखा नटसम्राट नाही असं म्हणत अनेक मुद्द्यावरुन खासदार कोल्हेंना आढळरावांनी लक्ष केलं.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com