Shiv Jayanti : शिवप्रेमींनाे ! शिवजयंतीला किल्ले शिवनेरीला जाणार आहात ? मग हे वाचाच

येत्या रविवारी राज्यासह देश, विदेशात शिवजयंती साजरी केली जाणार आहे.
chhatrapati shivaji maharaj, shivneri fort, shiv jayanti
chhatrapati shivaji maharaj, shivneri fort, shiv jayantisaam tv

Shiv Jayanti : शिवजन्मोत्सव (shiv jayanti at shivneri) निमित्ताने किल्ले शिवनेरी येथील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आल्या आहेत. किल्ले शिवनेरी (shivnderi fort latest news) गडावर (रविवारी, ता. 19 फेब्रुवारी) शिवप्रेमींची (chhatrapati shivaji maharaj) हाेणारी गर्दी लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडुन (police) वाहतुकीत मोठे बदल केल्याचे कळविण्यात आले आहे.

chhatrapati shivaji maharaj, shivneri fort, shiv jayanti
Mahashivratri : महाशिवरात्री निमित्त अंबरनाथ सज्ज, पाेलिसांसह पालिकेची जय्यत तयारी; अवजड वाहनांना बंदी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार शिवनेरी कडे येणाऱ्या चारही बाजुची वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने वळवून शिवनेरीच्या बाजूला असलेल्या वेगवेगळ्या वाहन तळांवर पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या वाहन तळावरून किल्ल्याकडे पायी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान किल्ल्यासह परिसरात पोलीसांचा मोठ्या प्रमाणात बंदाेबस्त लावण्यात येणार आहे. (Maharashtra News)

chhatrapati shivaji maharaj, shivneri fort, shiv jayanti
Shivendraraje vs Udayanraje : तुम्ही असं का वागता ? शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना सवाल

१८ फेब्रुवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते १९ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीच्या १२ वाजेपर्यंत शिवनेरी किल्ला व परिसरातील बदल रहाणार.

- पुणे नाशिक महामार्गावरुन नारायणगाव वरुन येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा, खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल रोडने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड पार्किंग या ठिकाणी जातील. ताथेड पार्किंग ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज, सावरगाव, वारुळवाडी, नारायणगांव, घोडेगाव मार्गे जातील.

- कल्याण नगर महामार्गावरुन शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे हायस्कूल व आसपासचे परिसरात असलेले पार्किंग ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण, नगर, नाशिक मार्गे जातील.

- आपटाळे, सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड पार्किंग येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील.

Edited By : Siddhath Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com