आय लव यु कचरा, आय लव यु खड्डा म्हणत शिवसेनेचे आंदोलन
आय लव यु कचरा, आय लव यु खड्डा म्हणत शिवसेनेचे आंदोलनसागर आव्हाड

आय लव यु कचरा, आय लव यु खड्डा म्हणत शिवसेनेचे आंदोलन

हे अनोखे आंदोलन कोंढव्यात करण्यात आले.

पुणे - शहरातील कोंढवा kondhwa परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजवले जात नाहीत त्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. मोठे खड्डे पडल्याने रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा Garbage जमा झालेला आहे. हा कचरा उचलला जात नसून हा कचरा उचलला जावा यासाठी महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार महादेव बाबर यांनी हातामध्ये पोस्टर घेऊन अनोखे आंदोलन केले.

हे देखील पहा -

आय लव यु कचरा, आय लव यु खड्डा म्हणत शिवसेनेने हे आंदोलन केले आहे. शिवसेनेने आंदोलन करत महानगरपालिकेचे लक्ष वेधले. महानगरपालिकेकडे मागणी करूनही महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे हे अनोखे आंदोलन कोंढव्यात करण्यात आले. महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याचबरोबर पाण्याचा तुटवडा आहे. मुबलक पाणी केव्हा मिळणार? पुढे खड्डा आहे गाडी सावकाश चालवा अशी वेगळे पोस्टर घेत महानगरपालिका व नगरसेवकांचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रसाद बाबर तानाजी लोणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com