Mumbai : ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी शिवसेना-भाजपची मोठी खेळी; मुंबईच्या ६ लोकसभा मतदारसंघासाठी आखली रणनीती

मुख्यमंत्री शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यावर जनजागृती करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून मोठी रणनीती आखण्यात आली आहे.
Mumbai News
Mumbai News Saam tv

मुंबई : मुख्यमंत्री शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यावर जनजागृती करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून मोठी रणनीती आखण्यात आली आहे. मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघांत दुचाकी फेरीच्या माध्यमातून आशीर्वाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

वरळीच्या जांबोरी मैदान परिसरातून ही यात्रा सुरू होणार आहे. मुंबादेवी येथे यात्रेचा समारोप होणार आहे. या निमित्ताने जांबोरी मैदान येथे भाजप-शिवसेना तर्फे जय्यत तयारी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून पक्षनाव आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे.

त्यानंतर ठाकरे गटाने कार्यकर्त्यांची निराशा आणि गैरसमज दूर करण्यासाठी 'शिवगर्जना' यात्रेचे आयोजन केले. ठाकरे गटाकडून 'शिवगर्जना' यात्रेच्या निमित्ताने विविध जिल्ह्यात जाहीर सभेचे आयोजन केले जात आहे.

Mumbai News
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची 'नायक' स्टाईल कारवाई, रुग्णालयात असुविधा पाहून तात्काळ डॉक्टरांचे निलंबन

ठाकरे गटाच्या 'शिवगर्जना' यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेनेने आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे. आशीर्वाद यात्रा ही मुंबईत (Mumbai) आज रविवारपासून सुरुवात होत आहे.

या आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व दोन्ही पक्षांचे नेते त्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेनेचे नेते विरोधी बाकावरील नेत्यांच्या विरोधात काय बोलणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

Mumbai News
Sharad Pawar : कसबा पोटनिवडणूक निकालानंतर शरद पवार स्पष्टच बोलले, सरकार त्यांचं, सत्तेचा वापर...

निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पक्षनाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर जनजागृती करण्यासाठी शिवसेना-भाजपने या आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले आहे.

उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून मुंबई सहाही लोकसभा मतदारसंघांत दुचाकी फेरीच्या माध्यमातून आशीर्वाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांभोरी मैदानापासून आशीर्वाद यात्रेची सायंकाळी पाच वाजता सुरुवात होणार आहे. तर रात्री नऊ वाजता मुंबादेवी येथे समारोप होणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com