Maharashtra Politics : संताजी-धनाजींची उपमा कोणाला देता? भास्कर जाधव यांचा बावनकुळेंना थेट सवाल

भास्कर जाधव यांनी नालासोपाऱ्यात शिंदे-फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. यावेळी जाधव यांनी बावनकुळे यांचाही खरपूस समाचार घेतला.
bhaskar jadhav
bhaskar jadhav saam tv

नालासोपारा - गुहागर मतदारसंघातील वस‌ई विरार क्षेत्रातील रहिवासी व स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आणी शिवसैनीकांचा संयुक्त जाहिर मेळावा नालासोपारा पूर्व येथे शनिवारी संध्याकाळी संपन्न झाला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

bhaskar jadhav
हृदयद्रावक! मुंबईत २ वर्षांच्या चिमुरडीला टेम्पोने चिरडलं; भावासमोरच बहिणीचा झाला करुण अंत, घटना CCTVत कैद

बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना संताजी-धनाजीची उपमा दिल्याने संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? असा सवाल भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी यांनी विचारला आहे. भास्कर जाधव यांनी नालासोपाऱ्यात शिंदे-फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. यावेळी जाधव यांनी बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचाही खरपूस समाचार घेतला.

भास्कर जाधव म्हणाले, 'बावनकुळेंना विचारा ते कोणत्या अर्थाने धनाजी आणि संताजी आहेत. ते माझ्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे जास्त सांगू शकतील. अनेक सरदार राष्ट्रीय भावनेने रक्षणा करिता त्यांनी प्राण पणाला लावले. त्यांच्यामध्ये संताजी आणि धनाजींचे नाव खूप मोठे होते. शामियानाचा कळस कापून आणला असा त्यांचा इतिहास होता, असे ते म्हणाले.

'मात्र, एकनाथ शिंदेंची धनाजी आणि संताजी यांच्याबरोबर तुलना करत असाल, तर गेल्या चार महिन्यापूर्वी धनाजीचं काय झालं? ते महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे बावनकुळे काय ते सांगू शकतील, असे भास्कर जाधव पुढे म्हणाले. भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाईल, हे पाहावे लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com