शिवसेनेच्या शाखेवरुन ठाण्यात राडा; शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने; शाखेला ठोकले टाळे

ठाण्यातील मनोरमानगर येथील शिवसेनेच्या शाखेवरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमने-सामने आले होते.
Shivsena News
Shivsena Newsविकास काटे

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील शाखाप्रमुख शाखेत बसले असताना ठाण्यातील राजन विचारे गटातील काही पुरुष व महिला पदाधिकारी यांनी शाखेत येऊन शाखेवर दावा केल्याने, शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले त्यामुळे आज मनोरमानगर शाखेबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून शिवगर्जना प्रतिष्ठान पुरस्कृत आनंद आश्रम सार्वजनिक मोफत वाचनालय अशा मजकूराचा फलक लावण्यात आला होता. या फलकावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटाकडून नवीन फलक लावण्यात आलेला फलकावर शिंदे गटाकडून पुन्हा जुना फलक लावण्यात आला आहे. (Balasaheb Thackeray and Anandi Dighe)

पाहा व्हिडीओ -

शिंदे गटाचा शिवसेना शाखा आनंद आश्रम वाचनालय असा मजकूर असलेला आणि बाळासाहेब ठाकरे ,आनंदी दिघे यांच्या फोटोसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला जुना फलक त्या ठिकाणी लावण्यात आला आहे. याच शाखेत उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांची नवीन फोटो देखील लावण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील शाखाप्रमुख शाखेत बसले असताना ठाण्यातील राजन विचारे गटातील काही पुरुष व महिला पदाधिकारी शाखेत आले आणि शाखेवर आपला दावा करु लागले. त्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते जमा झाल्याने काही काळ वातावरण तणावाचं बनलं होतं. पण पोलिसांच्या दक्षतेमूळे संपूर्ण प्रकार आटोक्यात आलं. मात्र, पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आले आणि जोरदार घोषणाबाजी करु लागले. या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत घालून पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी परत पाठवलं शिवाय पोलिसांनी शाखेला आता कुलूप लावलं आहे.

Shivsena News
मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, गुलाबराव पाटील चांगलं भाषण करायचे म्हणूनच...

पोलिसांनी या दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांना शांत केलं तरी देखील शाखेवरुन झालेल्या वादामुळे मनोरमानगर परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. तर या प्रकरणानंतर घटनास्थळी उद्धव गटाकडून खासदार राजन विचारे ,शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे आले होते. तर शिंदे गटाकडून प्रवक्ते नरेश म्हस्के ,माजी नगरसेवक राम रेपाळे, संजय भोईर, भूषण भोईर, मीनाक्षी शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित राहिले होते.

दरम्यान, या राड्यानंतर पोलिसांनी वातावरण शांत करण्यासाठी शाखेला कुलूप ठोकून दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्ते यांना परत पाठविले. तर राजन विचारे यांनी सदर शाखेत वाचनालय असून त्यावरती कोणीच आपला हक्क सांगू नये असे सांगितले. शिवाय महापालिकेने रस्त्यावरील खड्डे आणि इतर गैरसोयीकडे लक्ष ने देता सावरकर नगर येथील धर्मवीरांनी उद्घाटन केलेल्या व्यायामशाळेला सील ठोकल्याचा विचारे यांनी निषेध केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com