Dasara Melava: ‘आतुरता उध्दव साहेबांच्या गर्जनेची’; शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर प्रदर्शित

मुंबई महानगरपालिकेने मान्यता दिली नसली तरी शिवसेनेकडून मेळाव्याचे पोस्टर प्रदर्शित
Dasara Melava
Dasara MelavaSaam Tv

मुंबई - मुंबई: शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीमुळे राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट अशी शिवसेनेची विभागणी झाली. दरम्यान, शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे दोन गट निर्माण झाले आणि त्यामुळे आता दसरा मेळावा घेण्यावरूनही शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ सुरू आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्कसाठी मान्यता दिली नसली तरी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह ‘आतुरता उध्दव साहेबांच्या गर्जनेची’ असे लिहिण्यात आले आहे.

Dasara Melava
Dasara Melava: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार? आज निर्णय होण्याची शक्यता

या मेळाव्यात विरोधीपक्ष भाजप आणि विशेषत: शिंदे गटावर तोफ डागली जाणार असल्याचे बोलले जात आहे. आता फक्त उद्धव ठाकरे या बोलणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. दसरा मेळाव्यासाठी जागेचा प्रश्न असताना, मात्र शिवसेनेने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. काहीही झाले, तरी मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठीचे पोस्टर जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज मैदानात यंदा प्रथमच दसरा मेळावा घेण्यासाठी कोणालाच परवानगी न देण्याचा निर्णय मुंबई महापालिका घेण्याच्या तयारीत आहे. आज मुंबई महापालिका शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी आलेल्या दोन अर्जांवर निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com