Shivsena: पराभवाचे हादरे बसू लागल्याने भाजपने हिंदू-मुस्लीम हुकमी खेळ सुरु केलाय, 'सामना'तून जोरदार टीका

Uddhav Thackeray And Narendra Modi
Uddhav Thackeray And Narendra Modi saam tv

मुंबई : हिंदू जन आक्रोश मोर्चावरुन शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. पराभवाचे हादरे बसू लागले की, भाजप त्यांचा हुकमी खेळ सुरू करत असतो. आताही त्यांनी हिंदू-मुसलमान हा खेळ सुरू केला आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे.

हिंदूंनी त्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी शिवसेना भवनाचा परिसर निवडला. याचा अर्थ एकच, आजही सकल हिंदूंसाठी शिवसेना व शिवसेना भवन हेच एकमेव आणि शेवटचे आशास्थान आहे. त्यामुळे त्यांच्या आक्रोशाला नक्की न्याय मिळेल. (Latest News Marathi)

Uddhav Thackeray And Narendra Modi
Nashik Vidhan Parishad: नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान, पाच जिल्ह्यांत 338 मतदान केंद्रे तयार

सगळ्य़ांचे शिवसेनेवर 'लव्ह' आहे व दिल्लीच्या ढोंगी हिंदू सरकारविरुद्ध 'जिहाद' आहे. त्यामुळे 'लव्ह जिहाद'विरुद्धचा त्यांचा आक्रोशही महत्त्वाचा आहे. शक्तिमान हिंदू महाशक्तीचे कान बधिर झाले असले तरी शिवसेना भवन हिंदूंच्या आक्रोशाची नक्कीच दखल घेईल. असंही सामनात म्हटलं आहे.

Uddhav Thackeray And Narendra Modi
Odisha Health Minister Dies : ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचं निधन; पोलीस कर्मचाऱ्याने केला होता गोळीबार

हिंदू जन आक्रोश मोर्चे व आंदोलन म्हणजे स्वतःच्या नामर्दानगीवर पडदा टाकण्याचाच प्रकार आहे. महाराष्ट्रात व केंद्रात प्रखर हिंदुत्ववादी वगैरे सरकार आहे. मग तुमचे हिंदुत्व खतऱ्यात येतेच कसे? गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात मोदी-शहांचे रामराज्यच चालले आहे व हे राज्य म्हणजे हिंदूंचा स्वर्ग असल्याचे त्यांचेच लोक सांगतात. तरीही हिंदूंचा 'आक्रोश मोर्चा' निघावा हे आश्चर्यच म्हणायला हवे, असा टोलाही सामनातून करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com