Shivsena Dasara Melava 2022 : यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

यंदा शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray saam tv

Shivsena Dasara Melava : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai) दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर दोन्ही गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली आहे. तर मुंबई उच्च न्यालायाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.

Uddhav Thackeray
शिंदे गटाचं शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचं स्वप्न भंगलं; हायकोर्टाने याचिका फेटाळली

शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळाव्यावरून चांगलाच संघर्ष पेटला होता. दोन्ही गटाने दसरा मेळाव्यावर दावा केला होता. मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली होती.त्यामुळे दोन्ही गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आज मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही गटाच्या याचिकेवर सुनावणी केली.

आज मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. या दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाने ऐकला. मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला परवानगली दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, खरी शिवसेना कुणाची यावर आम्ही भाष्य करत नाही. तो निर्णय सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. या निकालाचा मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीवर कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई पालिकेच्या मागणीनंतर पोलिसांनी आपला अभिप्राय दिला. पोलिसंच्या अहवालाच्या आधारे पालिकेने दोघांचे अर्ज फेटाळले. अर्ज फेटाळून पालिकेने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
Shivsena Latest News: शिवाजी पार्कात ठाकरेंचाच आवाज घुमणार; दसरा मेळाव्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी

दरम्यान, शिवाजी पार्कचे मैदान ठाकरे गटाला देण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. शिवाय मेळाव्याच्या तयारीसाठी देखील मैदानाची परवानगी द्या; असं न्यायालयाने सांगितलं. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास याचिकाकर्ता जबाबदार असल्याचंही न्यायालयाने यावेळी सांगितलं आहे. तर अद्यादेशातील नियम व अटींच पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com