शिवसेना दसरा मेळावा शीवतीर्थावरच, तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री?, बॅनरची होतेय चर्चा

ठाकरे गटाचे एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत असून या बॅनरवरती 'आता ताकद दाखवणारचं, गद्दारांना शमा नाही! चलो शिवतीर्थ' असं लिहलं आहे.
Shivsena Dasara Melava
Shivsena Dasara MelavaSaam TV

मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाने मुळ शिवसेनेवर आपला दावा केला आहे. त्यासाठी आता शिवसेनेची (Shivsena) ओळख असणारा दसरा मेळाव्यावर आपला अधिकार सांगत, सेनेचा मेळावा आपणच शिवाजी पार्कवर घेणार असल्याची भूमिका शिंदे गटाने घेतली होती. त्यामुळे मेळावा कळीचा मुद्दा बनला आहे.

शिवसेनेतल्या बंडाचा फटका दसरा मेळाव्यालाही बसला आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कात मेळावा उद्धव ठाकरे घेणार की एकनाथ शिंदे घेणार यावरुन वाद सुरु आहे. शिवाय महापालिकेने शिवाजी पार्कवर दोन्ही गटांनाही परवानगी नाकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पाहा व्हिडीओ -

तर आम्ही त्याच मैदानात मेळावा घेणार असल्याचं ठाकरे गटाकडून बोललं जात असतानाच, ठाकरे गटाचे एक बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत असून या बॅनरवरती 'आता ताकद दाखवणारचं, गद्दारांना शमा नाही! चलो शिवतीर्थ' असं लिहलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा परवानगीविना शिवाजीपार्कमध्येच होणार की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

बॅनरवरती एकीकडे चलो शिवतीर्थ असं लिहलं आहे. तर त्याच बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचे दुसरे चिरंजीवर तेजस ठाकरेंचाही फोटो वापरण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरेंची राजकारणात एट्री होणार असल्याची चर्चा सुरु आहेत.

Shivsena Dasara Melava
ED, CBI च्या कारवायांमागे पंतप्रधानांचा हात नाही पण..., मोदींचा बचाव करताना ममता बॅनर्जींचा भाजपवर घणाघात

शिवाय हे पोस्टर सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असंल तरी दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत पालिकेकडून अद्याप कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे ठाकरे गट दसरा मेळावा कुठे घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com