संदीपान भुमरेंनी माझ्यासमोर लोटांगण घातले होते; संजय राऊतांचा हल्लाबोल

संजय राऊत यांच्यामुळेच आम्ही शिवसेना सोडली असल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला आहे.
Sanjay Raut News, Shivsena News in Marathi, Sanjay Raut Latest News, sandipan bhumre News,  latest politics news in marathi
Sanjay Raut News, Shivsena News in Marathi, Sanjay Raut Latest News, sandipan bhumre News, latest politics news in marathisaam tv

मुंबई: गेल्या काही दिवसापांसून शिवसेना (ShivSena) आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल माजी मंत्री संजय राठोड यांनीही राऊत यांच्यावर आरोप केले. संजय राऊत यांच्यामुळेच आम्ही शिवसेना सोडली असल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला आहे. यावर आज राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले.

Sanjay Raut News, Shivsena News in Marathi, Sanjay Raut Latest News, sandipan bhumre News,  latest politics news in marathi
Rain Update Live : कल्याण-डोंबिवलीमध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, बंडखोर आमदार जेव्हा मुंबईतून सुरतला गेले तेव्हा ते म्हणत होते, आम्ही हिदुत्वासाठी आम्ही बाहेर पडलो. तर दुसऱ्या दिवशी म्हणाले, आम्हाला राष्ट्रवादीचे (NCP) नेते निधी देत नव्हते म्हणून आम्ही बाहेर पडलो, तिसऱ्यांदा म्हणाले, पक्षातील काही लोक आमच्या विभागात हस्तक्षेप करत होते म्हणून हा निर्णय घेतला, आता म्हणत आहेत, संजय राऊतांमुळे बाहेर पडलो. माझ अस म्हणण आहे कारण एक ठरवा असे गोंधळू नका. (Sanjay Raut Latest News)

हे देखील पाहा

तुम्ही का गोंधळला आहात मला माहित आहे, तुमची अवस्था काय आहे मला माहित आहे. संजय राठोड यांच्या आरोपावर बोलताना राऊत म्हणाले, राठोड जाण्याअगोदर सामना कार्यालयात माझ्याजवळ येऊन बसले होते. संदीपान भुमरे यांनी माझ्या समोर येऊन लोटांगण घातले होते, म्हणाले तुमच्यामुळे मला मंत्रिपद मिळाले, असा हल्लाबोल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

ठाण्यातील ६६ नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा (ShivSena)बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे महानगरपालिकेतील ६७ नगरसेवक पैकी ६६ नगरसेवकांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन बंगल्यात जाऊन भेट घेतली. ६६ माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के समवेत या नगरसेवकांंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

६७ नगरसेवकांपैकी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे या मात्र शिवसेनेतच राहिल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (EKnath Shinde) गट आता अशी दुफळी ठाण्यात निर्माण झाल्याचे चित्र या भेटीमुळे दिसून येत आहे. (Eknath Shinde Latest News)


Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com