शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षादेश; 'या' आमदारांना मतदान करण्याच्या सूचना

प्राथम्यक्रम व सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान करावे, असा पक्षादेश आहे.
शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षादेश; 'या' आमदारांना मतदान करण्याच्या सूचना
Vidhan Parishad ElectionSaam TV

मुंबई : उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शिवसेना आमदारांसाठी (MLA) पक्षादेश जारी करण्यात आला आहे. या पक्षादेशामध्ये दिलेल्या सुचनेनुसार आमदारांनी मतदान करावे असा आदेश देण्यात आला आहे. (Vidhan Parishad Election)

शिवसेना (Shivsena) मुख्य प्रतोदांनी जारी केलेल्या पक्षादेशामध्ये लिहलं आहे की, 'विधानपरिषदेचे निवडणुकीचे मतदान सोमवार, दिनांक २० जून २०२२ रोजी सकाळी होणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे मतदान मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधानभवन, मुंबई (Vidhan Bhavan, Mumbai) येथे घेण्यात येणार असून सदर निवडणूकीसाठी शिवसेना पक्षाचे सचिन अहिर व आमश्या पाडवी (Sachin Ahir and Aamshya Padvi) हे दोन उमेदवार उभे असून शिवसेनेच्या सर्व विधानसभा सदस्यांनी पक्षाने दिलेल्या सूचनेनुसार प्राथम्यक्रमाने त्यांना मतदान करावयाचे आहे.

हे देखील पाहा -

सदर निवडणुकीसाठी शिवसेना पक्षांच्या उमेदवारांचा प्राथम्यक्रम व निवडणूकीच्या सूचना घेण्यासाठी सोमवार, दिनांक २० जून, २०२२ रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४ विधानभवन, मुंबई या दालनात सकाळी १० वाजता उपस्थित रहावे. आपल्याला देण्यात आलेल्या प्राथम्यक्रम व सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान करावे, असा पक्षादेश आहे. असं या आदेशात नमुद करण्यात आलं आहे.

एकिकडे शिवसेना नेत्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद आणि नाराज आमदारांमुळे राज्यसभेसारखी काही प्रकार घडू नयेत यासाठी सेनेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठीच हा व्हीप आता सेनेकडून जारी करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादीकडूनही व्हीप जारी -

दरम्यान, शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीकडून (NCP) देखील राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षाकडून आमदारांना व्हीप जारी केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्याच उमेदवारांना मतदान करावं यासाठीच्या सूचना तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर आमदारांना उमेदवारांचा पसंती क्रमांक कसा असावा याबाबत माहिती देण्यात येणार असून उद्या मतदानापूर्वी आमदारांसाठी दुसरा व्हीप जारी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com