Arjun Khotkar: शिंदे गटात सामील झाल्याच्या चर्चांवर अर्जुन खोतकरांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Shivsena Arjun Khotkar, CM Eknath Shinde
Shivsena Arjun Khotkar, CM Eknath ShindeSaam TV

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या बातमीमुळे जालना जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील शिवसेनेला जबर धक्का पोहचला आहे. या चर्चांवर आता र्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आहेत, त्यामुळे माझी त्यांच्याशी भेट झाली. भेटीचा वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही. बाकीचे खासदार सोबत दिसत आहेत हा योगायोग आहे. मी आणि मुख्यमंत्री दोघेही महाराष्ट्र सदनात आहोत त्यामुळे ही भेट झाली आहे. असं स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी दिले आहे. (Arjun Khotkar Raosaheb Danve Latest News)

Shivsena Arjun Khotkar, CM Eknath Shinde
Arujn Khotkar : खोतकरांची ठाकरेंसोबतची निष्ठा अखेर तुटली; रावसाहेब दानवेंनी भरवला पेढा

पक्षाने माझ्या गोष्टी एकून घेतल्या आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे माझी आजीबात नाराजी नाही. सध्या कुठेही जायचा विचार नाही. मी फक्त समोर भेटल्यामुळे नमस्कार केला, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पक्ष, आम्ही सर्वचं कुठे चुकलो याचा विचार करू. कोविडमुळे उद्धवजी कमी भेटले आहेत. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे, असंही अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) म्हणाले. अर्जुन खोतकर यांनी पाठींबा दिल्याचे नाकारले आहे.

Shivsena Arjun Khotkar, CM Eknath Shinde
शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही खिंडार? दोन दिग्गज आमदारांनी घेतली फडणवीसांची भेट

रावसाहेब दानवेंनी भरवला पेढा

शिवसेनेचे (ShivSena) उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही खिंडार?

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला (NCP) मोठे खिंडार पडले असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी ज्यावेळी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, यावेळी राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीचे (NCP) अध्यत्र शरद पवार यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com