Maharashtra Politics : मविआ सरकार लवकरच कोसळण्याची शक्यता? एकनाथ शिंदे घेणार राज्यपालांची भेट

MVA Government In Danger? आज एकनाथ शिंदे हे मुंबईत येऊन राज्यपालांची (Bhagatsingh Koshyari) भेट घेणार आहे.
Bhagat Singh Koshyari News, Maharashtra Political Crisis News, Eknath Shinde News in Marathi
Bhagat Singh Koshyari News, Maharashtra Political Crisis News, Eknath Shinde News in MarathiSaam Tv

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशीरा शक्तीप्रदर्शन केलं. एकनाथ शिंदे यांच्यासह ३६ आमदारांना सूरतमधून गुवाहाटीत हलवण्यात आलं होतं. आज एकनाथ शिंदे हे मुंबईत येऊन राज्यपालांची (Bhagatsingh Koshyari) भेट घेणार आहे. त्यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. सीआयएसएफ जवानांच्या सुरक्षेत ते राज्यापालांची भेट घेणार आहेत. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

काल (मंगळवारी) रात्री सामशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सत्तेसाठी असो वा राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाच्या मुद्दयावर फारकत घेऊ शकत नाही. तसंच जे हिंदुत्व बाळासाहेबांचे आहे ते हिंदुत्व आणि तीच कडवट भूमिका घेऊन आपण या पुढील राजकारण समाजकारण करणार असल्याचंही शिंदे म्हणाले. शिवाय आम्ही शिवसेना सोडली नाही आणि सोडणारही नाही असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत. शिवसेनेसह राज्यातील आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे यांनी आपला गुजरातमधील मुक्काम आता गुहावाटीला हलवला असून ते सध्या अज्ञात स्थळी आहेत. शिवाय शिंदे यांनी आज दुपारी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी वेळ मागितला असल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Political Crisis News)

Bhagat Singh Koshyari News, Maharashtra Political Crisis News, Eknath Shinde News in Marathi
एकनाथ शिंदे यांचा बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न - चंद्रकांत पाटील

दरम्यान, आसाम विमानतळावरती बोलताना शिंदे यांनी माझ्यासोबत ४० आमदार असून इतर १० आमदारांचा पाठिंबा देखील मिळणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील राजकारणात बरीच उलथापालत होणार असल्याचं दिसतं आहे. शिवाय एकनाथ शिंदे हे भाजपसोबत सरकार स्थापन करण्यात यशस्वी होणार की महाविकास आघाडी आणखी काही खेळी करणार याकडे राज्यभरातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com