
रुपाली बडवे
मुंबई : राज्यात बंडाळीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होऊन ३७ दिवस झाले आहेत. तरीही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत राज्यातील जनतेचे संबंधित कामे थांबू नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांच्या मंत्र्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या या संबंधित विभागांच्या सचिवांकडे सोपावल्या आहेत, यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
'सचिवाने कारभार पाहावा आदेश आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयाचं नाव सचिवालय करून टाका, अशा शब्दात सावंत यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईत माध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात माजी मंत्र्यांनी सरकारी बंगले न सोडण्यावरून पत्रकारांनी अरविंद सावंत यांना प्रश्न केला. त्यावेळी सावंत म्हणाले, 'सदर प्रश्न फार महत्वाचा विषय नाही. देशात तुम्हाला माहित नाही का, रामदास आठवले यांनी बंगला सोडला नव्हता. ज्यांनी बंगले सोडले नाही, त्यांनी बंगले सोडावे. बंगल्या पेक्षा राज्यकारभार कुठे आहे सांगा ? महाराष्ट्राला मंत्रिमंडळ आहे का ? राज्यात २ मंत्र्यांचे सरकार आहे. त्यात असंवैधानिक उपमुख्यमंत्री आहे, ते स्वत:च सांगतात की, ते पद असंवैधानिक आहे'.
'राज्यामध्ये बलात्काराची प्रकरणे वाढली आहेत, कुठे आहे सरकार ? महागाई वाढत आहे, कुठं आहे सरकार ? शेतकरी पुरामुळे मदतीची वाट पाहतोय, कुठं आहे सरकार ? एकही निर्णय शिंदे सरकार घेऊ शकत नाही. त्यात ते महामहिम राज्यपाल. राज्यात सचिवाने कारभार पाहावा आदेश आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयाचं नाव सचिवालय करून टाका.
मला या आदेशाचं आश्चर्य वाटलं. हा तर महाराष्ट्राच्या जनतेचा घोर अपमान आहे. ३७ दिवस झाले या राज्याला नवा मंत्री नाही, पद नाही, कारभार नाही. जनतेला मूलभूत प्रश्नांवरून दिलासा नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. जो यांच्या विरोधात बोलेल, तो देशद्रोही ठरवला जातो. खरं तर हा महाराष्टाराचा घोर अपमान सुरू आहे', असेही ते म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.