LIVE: सूरतमधील हॉटेलमध्ये शिवसेनेचे ३० आणि दोन अपक्ष आमदार

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार सूरतमध्ये असल्याची माहिती आहे
LIVE: सूरतमधील हॉटेलमध्ये शिवसेनेचे ३० आणि  दोन अपक्ष आमदार
Eknath Shinde Latest NewsSaam Tv

भाजपचे प्रमुख नेते गुजरातमध्ये

एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहेत. आता भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेही गुजरातकडे रवाना होत आहेत. रावसाहेब दानवे, कराड हे रवाना झाल्याचे कळते. सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

एकनाथ शिंदे-नार्वेकर यांच्यात चर्चा

एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सूरतमधील हॉटेलात गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांना सुरुवातीला अडवण्यात आले. या नाट्यानंतर अखेर नार्वेकर यांना हॉटेलात प्रवेश मिळाला. गेल्या २५ मिनिटांपासून नार्वेकर आणि शिंदे यांच्यात चर्चा सुरू असल्याचे कळते.

एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडण्याची शक्यता

एकनाथ शिंदे नाराज असून, समर्थक आमदारांसह ते सूरतमध्ये आहेत. एकनाथ शिंदे आज संध्याकाळी राजीनामा देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांना विमानाने दिल्लीला नेणार ? सूत्रांची माहिती

अभिजीत सोनवणे (प्रतिनिधी)

- एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांना विमानाने अमित शहांकडे नेणार?- सूत्रांची साम टीव्हीला माहिती

- हॉटेल ली मेरिडियन सूरत विमानतळाजवळ असल्याने शिंदेंसह आमदारांना विमानाने अमित शहांच्या भेटीला नेण्याची शक्यता

- संजय कुटे गेल्या २ तासांपासून ली मेरिडियनमध्ये

- २ तासांपासून सुरूय शिंदे आणि कुटे यांच्यात चर्चा

- मिलिंद नार्वेकर शिंदेंच्या भेटीला येण्याआधीच शिंदे आणि आमदारांना अमित शहांच्या भेटीला नेण्याची भाजपची खेळी?

शिवसेनेचे नेते विधीमंडळात जाणार

राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदेंऐवजी अजय चौधरींना नियुक्तीचं पत्र देणार असल्याचे कळते. विधानसभा उपाध्यक्षांना ते पत्र देणार आहेत, अशी माहिती समजते.

एकनाथ शिंदेंविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी

गद्दारांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.

आमच्या युतीत कोणताही फरक पडलेला नाही : शरद पवार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचे बोलले जात आहे. पण गेल्या पन्नास वर्षात मी पाहिलं आहे की अनेकदा क्रॉस व्होटिंग होऊनही सरकार चाललंय. मात्र असे असतानाही आमच्या युतीत कोणताही फरक पडलेला नाही.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एकीचा नारा

उद्धव ठाकरेंनी केला काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर संवाद

संघर्ष मला नवीन नाही, उद्धव ठाकरेंची भूमिका

काँग्रेसकडून एच के पाटील, कमलनाथ मुंबईत पोहोचणार, अशोक गेहलोत ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन

काँग्रेस आमदारांचा दिल्ली दौरा रद्द सर्वांना सायंकाळी ७ पर्यंत मुंबईत पोहोचण्याचे निर्देश

राष्ट्रवादीकडून शरद पवार मैदानात

"सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही" - एकनाथ शिंदेंचं ट्वीट

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही' अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. (Political crisis in Maharashtra)

एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवले

Eknath Shinde Latest News
Breaking: एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवले

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. शिवसेनेने आता अजय चौधरी यांना गटनेते पद दिले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे.

वर्षा निवासस्थानी सुरू असलेली शिवसेना आमदारांची बैठक संपली

शिवसेनेची वर्षा निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपली आहे. शिवसेना नेते, खासदार या बैठकीला उपस्थित होते.

शरद पवार काय म्हणाले?

- महाविकास आघाडी सरकार स्थापन्यापूर्वीही अशीच बंडाळी उठली होती

- काही तरी मार्ग निघेल यावर माझा विश्वास आहे.

- सरकारची कामगिरी गेल्या अडीच वर्षांपासून उत्तम आहे

- शिंदेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे हे ठाऊक नव्हतं

- शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे

मुख्यमंत्री यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार?

एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरे सरकारला प्रस्ताव दिल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनीही शिंदेंना प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर त्यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

अकोला: शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख बेपत्ता झाल्याची पत्नीची पोलीस ठाण्यात तक्रार

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख नॉट रिचेबल आहेत. देशमुख हे गुजरातला एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे सांगितले जाते. पण देशमुख यांच्या पत्नी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. देशमुख हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत.

मुख्यमंत्र्याचा निरोप घेऊन सेना नेते सूरतला रवाना

मुख्यमंत्र्याचा प्रस्ताव घेऊन शिवसेना नेते सूरतला रवाना झाले असून, एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव स्विकारणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

एकनाथ शिंदेंचा ठाकरे सरकारला प्रस्ताव...

एकनाथ शिंदें यांनी ठाकरे सरकारला प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रस्तावाद्वारे त्यांनी भाजपसोबत शिवसेनेने जावं आणि सरकार स्थापन करावं असा प्रस्ताव पाठवला आहे.

शिवसेना आमदार नितीन देशमुखांना हृदयविकाराचा झटका

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावरती सुरतच्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. देशमुख हे कालपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये मुक्कामी होते.

संजय राऊतांपाठोपाठ शरद पवारांची दिल्लीतली बैठक रद्द!

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. पवार मुंबईला येत असल्याने आघाडीच्या सर्व नेत्यांना मुंबईत थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न गुजरातच्या भूमीवर सुरु आहे - संजय राऊत

गुजरातमध्ये सेनेच्या आमच्या आमदारांना अडकवून ठेवलं आहे. तिथे कोणाचं सरकार आहे हे सर्वांना ठाऊक आहे. गुजरातमधील हॉटेलच्या बाहेर ७ स्थरांची सुरक्षा ठेवली असून मुख्य रस्त्यावर येण्याचे रस्ते देखील घेरले आहेत. महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न गुजरातच्या भूमीवर सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांचा दिल्ली दौरा रद्द! 

संजय राऊत यांचा आज नियोजित दिल्ली दौरा होता. मात्र, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यामुळे त्यांनी आपला आजचा दिल्ली दौरा रद्द केला आहे.

शिवसेना खासदारांना तातडीने मुंबईत दाखल होण्याचे आदेश

शिवसेनेसह महाविकास आघाडीकडून राजकीय हालचालींना वेग आला असून, एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात कोण कोण आहे. याची माहिती ठाकरे सरकारकडून घेतली जात आहे.

मोठा राजकीय भूकंप! एकनाथ शिंदेंसह हे '१७' आमदार नॉट रिचेबल; मविआ सरकार धोक्यात?

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतानाच ते गुजरातला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com