एकनाथ शिंदे गुजरातेत तर देवेंद्र फडणवीस दिल्लीत! मविआ सरकारचं काय होणार?

Shivsena Eknath Shinde Latest News : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
एकनाथ शिंदे गुजरातेत तर देवेंद्र फडणवीस दिल्लीत! मविआ सरकारचं काय होणार?
Shivsena Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis NewsSaam Tv

सुशांत सावंत

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात (BJP) प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल १७ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील एका हॉटेलात थांबले असल्याची सुत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज सकाळीच देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

याबाबत देवेंद्र फडणवीस विधान परिषद निवडणूक आणि महाराष्ट्रातील घडामोडी बद्दल पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहे, त्यासाठीच ते दिल्लीला गेल्याचे बोललं जात आहेत. तर भाजपाचे ३० ते ३५ आमदार मुंबईतच आहेत. सर्वांना काल विधान परिषद निवडणूकीत मतदानासाठी आलेल्या आमदारांना थांबण्याचा निरोप भाजपकडून देण्यात आले आहेत. तसेच मुंबईत थांबण्याचे आदेशही भाजच्या पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत.

शिंदे गुजरातच्या सूरतमधील ग्रॅंड भगवती हॉटेलमध्ये असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याचे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही म्हटले आहे. मात्र ते कुठे आहेत असं कधी सांगायचं असतं का, असा सवाल त्यांनी विचारला. अशा गोष्टीवर कोणतेही भाष्य करु नये. अन्यथा त्याला काहीही अर्थ उरत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, शिवसेना नाराज आमदार आणि शिंदे नॉट रिचेबल असल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा संपर्क करण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाकडून आपआपल्या आमदारांना संपर्क तात्काळ सुरु केला आहे. (Eknath Shinde not reachable)

Shivsena Eknath Shinde Latest  News, Devendra Fadnavis News
राज्याच्या राजकारणात नवीन काही तरी घडणार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा अर्थ काय?

हे आमदार आहेत नॉट रिचेबल

१) स्वतः एकनाथ शिंदे, ठाणे

२) अब्दुल सत्तार, सिल्लोड

३) प्रताप सरनाईक, ठाणे

४) संदीपान भुमरे, पैठण

५) संजय शिरसाठ, औरंगाबाद

६) बालाजी किणीकर, अंबरनाथ

७) विश्वनाथ भोईर, कल्याण पश्चिम

८) भरत गोगावले, महाड

९) शहाजी पाटील, सांगोला

१०) महेंद्र थोरवे, कर्जत

११) महेंद्र दळवी, अलिबाग

१२) संजय रायमूलकर, बुलडाणा

१३) संजय गायकवाड, बुलडाणा

१४) महेश शिंदे, सातारा

१५) संजय राठोड, यवतमाळ

१६) श्रीनिवास वनगा, पालघर

१७) रमेश बोरणारे, वैजापूर

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com