आई-बाप म्हणून भान असावं, जबाबदारीने वागा; किशोरी पेडणेकरांचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल

'मर्दानगी वगैरे बोलणे या महिलेला शोभत नाही. अजून किती खालच्या पातळीवर जाऊन बोलाल'
Kishori Pednekar
Kishori PednekarSaam TV

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि शिवसेना यांच्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला वाद मिटण्याची काही चिन्हे दिसतं नाहीत. राणा दाम्पत्याची अटक त्यानंतर त्यांना मिळालेला जामीन, राणा यांना पालिकेची दिलेली नोटीस आणि आता लीलावती रुग्णालयातील व्हायरल झालेला फोटो या सगळ्या प्रकरणांमुळे राणा विरुद्ध शिवसेना (Rana Vs Shivsena) वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय शिवसेनेकडूनही राणा दाम्पत्याबाबत अधिक आक्रमक पवित्रा घेण्यात येत असल्याचं चित्र दिसतं आहे. कारण, आज मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पुन्हा एकदा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) या राणाबाई आव्हान देत आहेत ते चुकीचं आहे. लहान मुलांना राजकारणात ओढून त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली होती. आई-वडील म्हणून याचं त्यांना भान तरी असावं, जबाबदारीनं वागा. मर्दानगी वगैरे बोलणे या महिलेला शोभत नाही. अजून किती खालच्या पातळीवर जाऊन बोलाल, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणांना सुनावलं. तसंच आम्ही डॉक्टरांना खडसावत नव्हतो. अशी चूक पुन्हा होता कामा नये, याची जाणीव करून देत होतो, असंही पेडणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

Kishori Pednekar
महाराष्ट्रात गोंधळ झाल्याचा कांगावा करण्याची गरज नाही; जयंत पाटलांचा पटोलेंना टोला

नवनीत राणा यांचा MRI करतानाचा फोटो व्हायरल (Viral Photo) झाल्यामुळे तिथे फोटो कसा काढण्यात आला, याविषयी लीलावती रुग्णालयाने स्पष्टीकरण देण्याची मागणी किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केली होती. शिवाय नवनीत राणांचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेकडून घेण्यात आला होता. या प्रकरणावरुन भाजपसह रवी राणा यांनी शिवसेना लीलावती प्रशासनावर दबाव टाकत असून त्यांना धमकावत असल्याचा आरोप केला होता. शिवाय कोरोना काळात आपणाला देवदुताप्रमाणे मदत करणाऱ्या डॉक्टरांबाबत असं वक्तव्य करणं हा तर सत्तेचा अहंकार असल्याचं रवी राणा म्हणाले होते. या सर्व टीकेच्या पार्श्वभूमिवर, आपण डॉक्टरांना खडसावत नव्हतो. अशी चूक पुन्हा होता कामा नये, याची जाणीव करून देत होतो असं स्पष्टीकरण पेडणेकर यांनी दिलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com