युसूफ लकडावाला आणि 'या' बाई कोण? मनिषा कायंदेंचा अमृता फडणवीसांना टोला

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक प्रकरणं गाजत आहेत. त्यातलच एक प्रकरण म्हणजे युसूफ लकडावाला प्रकरण.
युसूफ लकडावाला आणि 'या' बाई कोण? मनिषा कायंदेंचा अमृता फडणवीसांना टोला
Manish Kayande- Amruta FadnavisSaam TV

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या अनेक प्रकरणं गाजत आहेत. त्यातलच एक प्रकरण म्हणजे युसूफ लकडावाला प्रकरण. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवनीत राणांचे युसूफ लकडावाला सोबत संबंध असल्याचे ट्वीट केले आणि राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी (Navneet Rana) युसूफ लकडावालाकडून ८० लाखांचे कर्ज घेतले असल्याचा दावा संजय राऊतांनी ट्वीटमध्ये केला होता. आता शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्वीट करत निशाणा साधला आहे.

मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीस आणि युसूफ लकडावाला यांचा फोटो ट्वीट केला आहे. आणि त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलय “मुंबई हल्ल्याचा आरोपी दाऊदचा माणूस युसुफ लकडावाला. आणि या बाई कोण हे काही सांगायला हवे का? लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे? आता यांना कोणता न्याय लावावा?”. दरम्यान मागे देवेंद्र फडणवीस यांचाही एक फोटो सचिन सावंत यांनी ट्वीट केला होता. भाजप नेते मोहित कंबोज यांनीही युसूफ लकडावाला आणि राजीव गांधी यांचा सोबतचा फोटो पोस्ट केला होता.

युसूफ लकडावालाला २०० कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्याचा लॉकअपमध्येच मृत्यू झाला होता. युसूफच्या संपत्तीच्या काही भाग अजूनही नवनीत राणांकडे आहे मग ईडी नवनीत राणांना चहा प्यायला कधी बोलावणार? डी-गँगला वाचवले जात आहे का? भाजप गप्प का ? असे अनेक सवाल संजय राऊतांनी विचारले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.