'उद्धव ठाकरे येणार आहे म्हणाले, तरी शिवसेना आमदार...'; नीलम गोऱ्हे यांचा मोठा गौप्यस्फोट

पुण्यात शिवसेनेने शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात विधान परिषदेच्या उपसभापती , शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे
Neelam Gorhe
Neelam GorheSaam tv

प्राची कुलकर्णी

पुणे : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षातील प्रमुख नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी सभा, बैठका, यात्रांचा सपाटा लावला आहे. तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेपुढे मोठं पक्ष संकट उभ ठाकलं आहे. बडखोरीनंतर पक्ष बांधणीसाठी शिवसेना नेत्यांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेनेने शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात विधान परिषदेच्या उपसभापती , शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Neelam gorhe News In Marathi )

Neelam Gorhe
२०२४ नंतरचा काळ आमचाच, पवार कुटुंबीय मार्गदर्शन करणार;रोहित पवार स्पष्टच बोलले

नीलम गोऱ्हे गौप्यस्फोट करताना म्हणाल्या की, 'विधान परिषदेच्या निवडणुकी वेळी दुपारी लक्षात आलं की, काही तरी विचित्र चाललं आहे. आमदार मतदानाची घाई करत होते. जेवणाची घाई करत होते. उद्धव ठाकरे येणार आहे म्हणाले, तरी शिवसेना आमदार थांबायला तयार नव्हते. घाईने बाहेर पडले, वाहनात बसले आणि सामान मागवलं. बहुतेक जणांना सांगितलं होतं की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहे'.

Neelam Gorhe
शिवसेना कुणाची? EC च्या नोटिशीवर राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी...

'आता मुख्यमंत्री शिंदे यांना देवेंद्र फडवीसांची ऐकायची सवय झाली आहे. डावीकडे उजवीकडे सुचनांसाठी बघतात. शिवसैनिकांनो आता काय होणार याचा विचार करत बसू नका. सण आले आहेत. सणांसाठी मदतीला तयारीला लागा', असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या पुत्रांवर टीकास्त्र सोडलं.

तसेच या मेळाव्याला आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) देखील उपस्थित होते. त्यांनी शिवसैनिकांना मार्ददर्शन केलं. अहिर यांनी यावेळी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. अहिर म्हणाले, 'झाडी, डोंगार हाटील आम्ही पण दिलं. पण त्यांना आपलं आवडलं नाही. त्यात काही लोक जास्त वेळ महाबळेश्वरालाच घालवायचे. त्यामुळे त्यांना पण वाटलं, जरा पुण्याकडे बघुया'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com