Sanjay Raut |रडायचं नाही लढायचं; संजय राऊत यांनी ईडी कोठडीतून लिहिले विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र

राऊत यांनी ई़डीच्या कोठडीतून त्यांना अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या नेत्यांचे पत्रातून आभार मानले आहेत. राऊत यांनी सदर पत्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिले असून ते माध्यमांसमोर आले आहे.
sanjay raut file photo
sanjay raut file photo saam tv

Sanjay Raut Letter : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. तर दुसरीकडे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (Ed) अटक केली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. राऊत यांनी ई़डीच्या कोठडीतून त्यांना अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या नेत्यांचे पत्रातून आभार मानले आहेत. राऊत यांनी सदर पत्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिले असून ते माध्यमांसमोर आले आहे. राऊतांनी या पत्रातून 'रडायचं नाही लढायचं' या बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून दिली आहे.

sanjay raut file photo
जनता ठरवेल मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कोणाला करायचं, अजित पवारांचा हल्लाबोल

संजय राऊत यांनी पत्रातून सर्व विरोधी पक्षातील नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची आठवण ही विरोधी पक्षाच्या नेत्यांना करून दिली आहे. 'रडायचं नाही लढायचं,जे सत्य आहे त्यासाठी लढा', या बाळासाहेबांच्या विचाराची आठवण राऊत यांनी मित्र पक्षातील नेत्यांना करून दिली आहे.

राऊत यांनी पुढे लिहिले आहे की, 'मी या पत्राच्या माध्यमातून मला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांचे आभार व्यक्त करतो. संसदेत आणि संसदेबाहेर उपस्थित केलेल्या मुद्द्यावर आपण सर्वांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल आभार'.

sanjay raut file photo
Gram Panchayat Election 2022: शिंदे गटातील आमदारांचे मताधिक्य टिकवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न; मोर्चेबांधणी सुरू

दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांना हे सदर पत्र संजय राऊत यांनी लिहिले आहे. अडचणीच्या काळात तुम्हाला कळते की, तुमचे खरे सहकारी कोण आहेत. मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. केंद्रीय यंत्रणांनी माझ्यावर राजकीय हेतूनं कारवाई केली, त्यावेळी तुम्ही सर्वांनी मला साथ दिली. तसेच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे राऊत कुटुंब आणि हिंतचिंतकाचे देखील आभार मानले आहेत. माझी लढाई यापुढे सुद्धा सुरू राहील. अंतिम श्वासापर्यंत लढत राहिन, दबावापुढे झुकणार नाही, विजय आमचाच होणार आहे आणि देश योग्य दिशेने पुढे जाईल, असेही राऊत यांनी पत्रात लिहिले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com