शिवसेना नेते अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

शिवसेना नेते अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेना नेते अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
शिवसेना नेते अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताSaam Tv News

शिवसेना नेते अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या परिवहन विभागात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात त्याच बरोबर बदल्यांबाबत सुरू असलेल्या गैर व्यवहाराची दखल ईडीने घेतली आहे. त्यानुसार या घोटाळ्याविरोधात न्यायालयात याचिका करणाऱ्या गजेंद्र पाटील यांना आज पुन्हा ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यानुसार गजेंद्र पाटील हे ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. (ShivSena leaders Anil Parab and Pratap Saranaik are likely to face increasing difficulties)

हे देखील पहा -

नुकतीच वर्धा जिल्ह्याचे परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची चौकशी झाली होती. पाटील यांच्या आरोपांमध्ये परब यांचे नाव असल्याचीही चर्चा आहे. परब यांना यापूर्वी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते, मात्र ते गैरहजर राहिले. त्यामुळे पाटील यांच्या चौकशीनंतर पुन्हा परब यांना ईडी समन्स बजावून बोलवू शकते.

शिवसेना नेते अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
बाम्हणी- वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या दोघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध सुरु

प्रताप सरनाईक यांचीही डोकेदुखी वाढण्याची शक्यता

NSCL गैरव्यवहार प्रकरणात सरनाईक यांचे निकटवर्तीय योगेश देशमुख यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीकडून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दिलेला आहे. योगेश यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. तर या प्रकरणात शिवसेनेचे सरनाईक यांनाही ईडीने समन्स बजावून अनेक वेळा चौकशीसाठी बोलावले, मात्र सरनाईक अद्याप हजर राहिलेले नाहीत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com