Aaditya Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'CM शिंदे कार्यक्रमात...'

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून जोरदार हल्लाबोल केला.
Eknath shinde and aaditya thackeray
Eknath shinde and aaditya thackeray saam tv

निवृत्ती बाबर

Aaditya Thackeray News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून जोरदार हल्लाबोल केला. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसच्या कार्यक्रमात उशिरा पोहचले, त्यानंतर लगेच परत आले. मग ४० कोटी खर्च का केले? तिथल्या कामाच्या वेळा मुख्यमंत्र्यांची उपस्थिती बघता दावोस दौरा फसवणूक, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)

Eknath shinde and aaditya thackeray
Devendra Fadnavis | मला अटक करण्याचं टार्गेट दिलं होतं,MVA सरकारनं रचला होता प्लॅन?

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, 'टेंडर न काढता कामे दिली गेली, चर्चा न करता दिली. ठेकेदार ठरवून कामे देण्यात आली. अद्यापही कामे सुरु झालेली दिसत नाही. टेंडरची प्रक्रिया राबविली गेली नाही हे स्पष्ट. आम्ही मुद्दा उचलून मनपाचे ४५० कोटी रुपये वाचवले'.

'दावोसचा खोल अभ्यास केला तर अनेक विषय उपस्थित होतात. सरकारचा अधिकृत कार्यक्रम १६ ते २० तारीख असा नियोजित होता. चार दिवसांचे सरासरी ४० कोटी खर्च. दहा कोटी प्रत्येक दिवस खर्च. दावोसला चार्टर्ड विमान त्याचा खर्च. चार्टर्ड वापराला विरोध नाही. पण चार्टर्ड विमान वेळेवर पोचण्यासाठी घ्यायला हवे होते. परंतु मुख्यमंत्री उशीरा पोहोचले. संध्याकाळी पॅवेलियनचे उद्घाटन. त्यांनी बैठका घेतल्याचे दिसून येत नाही. मित्र परिवारासोबत गेले का? त्यांचा खर्च अधिकृत का अनाधिकृत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

'१६ तारखेचा दिवस वाया घालवला. १७ तारखेला मुख्यमंत्री असूनही त्यांना भाषणाची काँग्रेस मध्ये एकच संधी. ते झाल्यावर मुख्यमंत्री रात्री मुंबईत परत आले. मुंबईत येऊन मी मोदींचा माणूस म्हणाले. मुख्यमंत्री एका मोठा कार्यक्रमात उशीरा पोचतात. लगेच परत येतात. मग ४० कोटी खर्च का केले? मग यांना खरच गांभीर्य होत का? तिथे नक्की काय कार्यक्रम झाले याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. सरकार एमआयडीसीने काहीच अद्याप जाहीर केलेले नाही. तिथल्या कामाच्या वेळा मुख्यमंत्र्यांची उपस्थिती बघता दावोस दौरा फसवणूक, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Eknath shinde and aaditya thackeray
Imtiyaz Jaleel : रंग काय कोणाच्या बापाची जहागीर आहे का?, इम्तियाज जलील संतापले; थेट मोदींना केला सवाल

'१३ डिसेंबर २०२२ कॅबिनेट मिटिंग त्यातल्याच चार कंपन्या या सरकारने दावोस मध्ये दाखवल्या. जाहीर झालेली कामे दाखवून सरकार खोटे बोलले. सगळा प्रकार हास्यास्पद. महाराष्ट्रात सही केलेले एमओयु तेच तिथे दाखवले. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान देतो तिथे नक्की काय केले. २८ तासासाठी ४० कोटी खर्च कितपत योग्य. जे आकडे दाखवतात त्यातून अगोदरचे जाहीर झालेले आकडे कमी करायला हवे. जी गुंतवणूक वेदांता फाॅक्सकाॅन पेक्षा कमीच आहे. अद्यापही वेदांताचे काम सुरु झालेले नाही. टक्केवारीची कामे त्यांना माहिती. मला मुंबई जास्त माहिती, असेही आदित्य ठाकरे पुढे म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com