Sanjay Raut | 2024 नंतर उलटी गंगा वाहू लागेल, संजय राऊतांची भाजप सरकारवर टीका

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
संजय राऊतांची भाजप सरकारवर टीका
संजय राऊतांची भाजप सरकारवर टीका Saam Tv

मुंबई : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच, 2024 मध्ये चित्र बदलेल असंही ते म्हणाले. - Shivsena MLA Sanjay Raut Criticize BJP Govt

या अधिवेशात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. त्यासाठी नियम बदलले जात आहेत. सरकार नियमबाह्य वर्तन करत असल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, "त्यांना नियमबाह्य वाटत असेल तर ते आम्ही केंद्र सरकारकडून शिकलो आहोत. हे त्यांनी समजून घ्यावं. केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही काही गोष्टी करत असू तर त्यांनी याचं स्वागत केलं पाहिजे. केंद्र सरकार किती नियमाने वागत आहे हे सर्व देशाला माहित आहे."

हेही वाचा -

संजय राऊतांची भाजप सरकारवर टीका
हिवाळी अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या मानेला त्रास होऊ नये म्हणुन सस्ता गुळगुळीत...

"इतर राज्यांमध्ये काय चाललंय ते पाहावं लागेल आणि केंद्राच्या ज्या सूचना आहेत, गर्दी टाळा सार्वजनिक कार्यक्रम कमी करा, अशा अनेक सूचना या नवीन कोरोनाच्या व्हेरिएंट संदर्भात सांगितल्या आहेत, त्यानुसार हे अधिवेशन अगदी व्यवस्थित होतंय. विरोधकांना गोंधळ घायालचाय म्हणून दिवस वाढवायचे नाहीये. अधिवेशनात गोंधळ घालून बंद पाडण्यासाठी त्यांना दिवस हवे असतील, तर तसे दिवस त्यांना देता येणार नाही. कामाचे दिवस सरकारने ठरवले आहेत. विरोधीपक्षाने त्या काळात काम करावे", असं ते म्हणाले.

भाजपच्या कार्यालयातून जर ईडीची सूत्र हालात असतील तर...

"भाजपच्या कार्यालयातून जर ईडीची सूत्र हालात असतील तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, किंवा आमचे सहानुभूतीदार असतील त्यांना अशा प्रकारचा त्रास होणारेय हे आम्ही गृहीत धरलंय. काल जया बच्चन यांच्या सूनेला आणि मुलासंदर्भात मी ऐकलं. जे सरकारविरोधात बोलतील, जे प्रश्न विचारतील त्यांना ईडी, सीबीआय़, इनकम टॅक्स, एनसीबी यांच्यासमोर उभं केलं जाईल, त्यांना अपमानित केलं जाईल. त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जाईल. हे आता सूत्र झालेलं आहे. हे 2024 पर्यंत चालेल. त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल", असंही संजय राऊत म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com