काय ती टोपी.. काय तो रुमाल.. काय ती फुसकी गर्जना; अंबादास दानवेंचा मंत्री भुमरेंना टोला

शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ट्विट करत शिंदे गटाच्या नेते संदिपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
ambadas danve
ambadas danve saam tv

रश्मी पुराणिक

Ambadas Danve News : शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. बंडखोर शिंदे गटाने खरी शिवसेना असल्याचा दावा करत दसरा मेळाव्यावरही दावा केला आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे राज्यात दसरा मेळाव्याआधीच राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याचदरम्यान, शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ट्विट करत शिंदे गटाच्या नेते संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर निशाणा साधला आहे.

ambadas danve
शहाजीबापू पाटील यांनी केली अजित पवारांवर बोचरी टीका; म्हणाले, इंदूरीकर महाराजांचे...'

शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी दसरा मेळाव्यासाठी जय्यत केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर शिवसेनेच्या त्याच्यांसहित ४० आमदारांच्या गटाने हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी भाजपला साथ देत राज्यात सत्तेवर विराजमान झाले. त्यानंतर राज्यातील संपूर्ण राजकारण बदललं आहे.

शिवसेनेतील ४० आमदार, १२ खासदार आणि पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे शिवसेनेवर मोठं संकट उभ ठाकलं आहे. तर शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, त्याआधीच शिवसेना नेत्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टार्गेट करणे सुरू केले आहे.

दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात राजकारण तापलं आहे. याचदरम्यान, शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी ट्वीट करत संदिपान भुमरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'सत्तारांची नमाज आणि भूमरेंची टोपी! व्वा रे हिंदू गर्व गर्जना यात्रा! म्हणे, गर्व से कहो हम हिंदू है! काय ती टोपी.. काय तो रुमाल.. काय ती फुसकी गर्जना! व्वा! ओक्के!', अशा शब्दात ट्विट करत अंबादास दानवे यांनी मंत्री भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com