Sanjay Raut: शिंदे गट म्हणजे टोळी, अशा टोळ्या गँगवॉर किंवा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारल्या जातात; संजय राऊतांची टीका

शिंदे गट समर्पित झालेला आहे, विलीन झालेला आहे. भाजपमध्ये त्यांच्यातला शिवसैनिक मेलेला आहे.
sanjay raut and eknath shinde
sanjay raut and eknath shinde saam tv

>> जयश्री मोरे

Sanjay Raut on Shinde Group : शिंदे गट हा मांडलिक आहे. त्यांना स्वत:चं वेगळं असं अस्तित्त्व नाही. त्यामुळे शिंदे गट ही फक्त एक टोळी झाली आहे. अशा टोळ्या फार काळ टिकत नाहीत. या टोळ्या गँगवारमध्ये किंवा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारल्या जातात, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

शिंदे गट समर्पित झालेला आहे, विलीन झालेला आहे. भाजपमध्ये त्यांच्यातला शिवसैनिक मेलेला आहे. त्यांचा जो पक्ष आहे तो भाजपमध्ये विलीन करत आहेत, त्यामुळे त्यांना एकही जागा नाही. या उलट शिवसेना आमची उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातली शिवसेना महाराष्ट्रासाठी हिंदुत्वासाठी यापुढेही लढत राहील संघर्ष राहील. त्यांचा एक गट टोळी आहे. टोळीला अस्तित्व नसतं टोळी ही एकत्र गँगवारमध्ये मारली जाते. किंवा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारली जाते. हा मुंबईतला इतिहास मला माहित आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

sanjay raut and eknath shinde
Nashik News: भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार; अंगात दैवी शक्ती असल्याचे भासविले, पत्‍नी– मुलांचाही सहभाग

शिवाजी महाराजांचा अपमान हा सर्वात मोठा अपमान

छत्रपती शिवाजी महाराज माफीवीर होते का? छत्रपती शिवाजी महाराज हे जुने पुराने इतिहासातील नेते आहेत का? आता त्यांचं महत्त्व नाही हे भाजपला मान्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा सर्वात मोठा अपमान आहे. इतर राज्यांना भूगोल आहे महाराष्ट्राला इतिहास आहे. हा इतिहास यासाठी आहे कारण इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आम्हाला इतिहास आहे भाजपच्या राज्यपालांना हा इतिहास मान्य नाही का? भाजपच्या नेत्यांना मान्य नाही का? असा परखड सवाल संजय राऊत यांनी विचारला.

sanjay raut and eknath shinde
Laxman Jagtap : राजकारणत ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला; फडणवीसांनी व्यक्त केली शोकसंवेदना

महाराष्ट्राचा स्वाभिमान हा छत्रपतींपासून सुरू होतो आणि संपतो.भाजपचे (BJP) नेते, मुख्यमंत्री छत्रपती यांच्या अपमानाबाबत गप्प बसलेत आणि दुसऱ्या विषयाकडे लक्ष फिरवत आहेत. संभाजीनगरचं नामांतरण महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री यांनी केले आहेत, याची आठवण देखील संजय राऊत यांनी करुन दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com