'... अन् जास्तीत जास्त सत्ता जाईल; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

हा आमच्या घरातील विषय आहे. नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील.
Sanjay Raut News, Sanjay Raut Latest Marathi News, Eknath Shinde News, Political Crisis News
Sanjay Raut News, Sanjay Raut Latest Marathi News, Eknath Shinde News, Political Crisis NewsSaam TV

मुंबई - कालपासासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या चर्चा कालपासून राज्यासह देशभर सुरु आहेत. यासर्व घडामोडींवर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut News in Marathi)

शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल आणि सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी यावेळी दिले. आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होईल अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

हे देखील पाहा -

तसेच, आज सकाळीच एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन तासभर चर्चा झाल्याची माहिती देखील राऊतांनी यावेळी दिली. एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार स्वगृही परत येतील. आज एकनाथ शिंदे यांच्याशी माझ फोनवर बोलण झाले. मी याबद्दची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. काही समज आणि गैरसमज नक्की आहेत पण ते लवकरच दुर हेतील याचा मला विश्वास आहे. ५६ वर्षात शिवसेनेने अनेकदा संकटातून गरूड झेप घेतली आहे.

Sanjay Raut News, Sanjay Raut Latest Marathi News, Eknath Shinde News, Political Crisis News
महिला विश्वकरंडक हाॅकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर; फलटणच्या अक्षता ढेकळेचा समावेश

एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोप नाही, असंही ते म्हणाले. हा आमच्या घरातील विषय आहे. नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदेंचं बंड शांत होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच, आसाममध्ये सर्व आमदारांनी पर्यटन करावे देशभर फिरावे. गुवाहाटीला काझीया रंगा जंगल खुप सुंदर आहे.असं संजय राऊत म्हणाले.

पुढे राऊत म्हणाले की, राज्यपालांना कोरोना झाला असल्याने काम थोडं धीम्या गतीने सुरु आहे. राज्यपालांना थोडं बरं वाटू द्या त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत ते समजेलच. उगाच जास्त उतावीळपणा नको. असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com