Maharashtra Politics : "अंधेरी निवडणुकीत नोटाला जास्त मते हा सगळा भाजपचा डाव"

"मशाली वर पहिला आमदार निवडून येत आहे"
Nota
NotaSaam Tv

मुंबई - अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष झालेल्या या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. यावर आता नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Nota
Andheri East Bypoll Result : सातव्या फेरीअखेर नोटांना ४ हजार मतं; ऋतुजा लटके कितीने आघाडीवर? वाचा...

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, अंधेरी निवडणूकीत नोटाला जास्त मते हा सगळा भाजपचा डाव असल्याचं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. लोक त्रासलेली आहेत. भाजपने लोकांना फुस द्यायचा प्रयत्न केला. उध्दव ठाकरे जे म्हणाले ते सत्य होत आहे. मशाली वर पहिला आमदार निवडून येत आहे. यांच्या सगळ्या कामाला मतदाराने चांगल उत्तर दिलं आहे. तर भाजपने कलंकित उमेदवार दिला होता. निवडणूक बिनविरोध केली जात असते पण तस झाल नाही. या सोबतच ऋतुजा लटके यांचं अभिनंदन करत त्यांना ६० हजारच्या पुढे मते मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

या पोटनिवडणुकीसाठी तीन नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती.त्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी 31.74 टक्के मतदान झालं होतं. शिवसेनेतील फुटीनंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलं आहे.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com