
मुंबई : शिवसेनेवर नाराज होऊन बंड पुकारणारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी एक आमदार मागे फिरले आहेत. मात्र, आपण शिंदे यांच्या तावडीतून सुटल्याचं सांगतांना आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) यांच्या डोळ्यातून अश्रु धारा वाहू लागल्या. (Shivsena Political Crisis News)
उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांना देखील शिवसेनेच्या इतर आमदारांसाखे ठाण्यात स्नेहभोजनासाठी बोलवण्यात आलं होतं. रात्री उशिरा सर्व आमदारांसह पाटील यांनी देखील गाडीत बसविण्यात आलं. मात्र, गाडी मुंबई बाहेर गुजरातच्या दिशेने जायला लागल्यामुळे पाटील यांच्या मनात शंका उपस्थित झाली शिवाय गाडीत बसतानाच त्यांचा फोन देखील काढून घेतला होता. (Shivsena MLA Kailas Patil News)
त्यामुळे रात्रीच्या अंधारात गाडी गुजरातच्या (Gujarat) दिशेने जात असताना त्यांनी हे काही तरी वेगळ होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र त्यांना कोणालाही काही सांगता येत नसल्यामुळे ते तसेच बसून राहिले.
हे देखील पाहा -
दरम्यान, गुजरात सीमेवर गाडी चहापानासाठी थांबली असता कैलास पाटील यांनी लघुशंकेच्या निमित्ताने अंधाराचा फायदा घेत गपचूप पळ काढला. पावसात ते रस्त्यावरून धावत होते नंतर एका ट्रकमध्ये बसून ते मुंबईच्या दिशेने जवळपास ४ किलोमीटरपर्यंत आले. ट्रक दुसऱ्या बाजूने जाणार असल्याने ते उतरले आणि हात दाखवत गाड्या बदलत ते कसेबसे मुंबईत पोहचले.
मुंबईत पोहचताच त्यांनी थेट ‘मातोश्री’ गाठली आणि आपल्या पक्षप्रमुखांना व्यथा सांगताना त्यांना रडू कोसळलं शिवाय त्यांची ही थरारक कथा ऐकून ऐकणाऱ्यांना देखील गहीवरुन आलं. दरम्यान, कालपासून राज्याच्या राजकारणात वादळ उठवणारे शिवसेना (Shivsena) नेते आपल्या बंडावर कायम असून त्यांनी ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने भाजपासोबत युती करण्याबाबत त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
तर शिंदे यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फोनवरून संपर्क केला असून त्यांच्याशी २० मिनिटे चर्चा केली असून शिंदे यांना मुंबईत या मग आपण बोलू असं सांगण्यात येत आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी शिंदे परत येतील,असा विश्वास व्यक्त केला आहे.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.