Uddhav Thackeray : 'नरेंद्र मोदींचा माणूस आता शरद पवारांचा सल्ला घेतो, मग मी...'; उद्धव ठाकरे CM शिंदेंवर बरसले

'परवा बाळासाहेबांचाचा माणूस, काल मोदींचा माणूस आता पवारांचा सल्ला घेतो. मग मी काय घेत होतो? असा सवाल करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर जोरदार बरसले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Saam tv

निवृत्ती बाबर

Uddhav Thackeray News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिनानिमित्तच्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली. 'परवा बाळासाहेबांचाचा माणूस, काल मोदींचा माणूस आता पवारांचा सल्ला घेतो. मग मी काय घेत होतो? असा सवाल करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर जोरदार बरसले. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेबांच्या तैलचित्रावरून हल्लाबोल; म्हणाले,आनंद आहे, पण...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे उपस्थिताना संबोधित करताना म्हणाले, ' तोच जोश तोच उत्साह आणि तीच गर्दी. अनेक दिवसानंतर एका मोकळे वातावरणात शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस. हे समोर जे आहे ते विकल्या जाऊ शकत नाही. मला पण एक माहिती कळाली, राऊतांना अनेक देशाचे पंतप्रधान भेटले. मला तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भेटले मला म्हणाले मी उद्या भाजपात चाललोय. उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंधे गटात अथवा भाजपात गेलेत तर नवल नाही'.

'आज प्रकाश आंबेडकर सोबत आले. देशाची लोकशाही धोक्यात. त्यांचे हिंदुत्व थोतांड. कलिना विद्यापीठाच्या कार्यक्रमाची आठवण. आज दोन्ही नातू एकत्रित आले. चीन दौऱ्याची आठवण. आज सुभाषबाबूंचा, प्रमोद नवलकरांचा वाढदिवस. तिकडे विधिमंडळात बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण', असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'परवा बाळासाहेबांचाचा माणूस, काल मोदींचा माणूस आता पवारांचा सल्ला घेतो. मग मी काय घेत होतो? सरदार पटेल, बाबासाहेब, बाळासाहेब पण आमचेच. मोदी असले तरी बाळासाहेबांशिवाय तुम्ही कुणीच नाही हे तुम्हीच सिद्ध केले. या महाराष्ट्रात बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, अशी टीका ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केली.

'आपल्या कामाचेच पंतप्रधानांनी भूमिपुजन केले. तीन वर्ष आम्ही काम केले म्हणून तुम्ही भूमिपुजन करु शकलात. मोदी जे बोलले ते भयानक आहे. भक्त अंध समजू शकतो पण गुरु सुध्दा. २००२ पर्यंत मुंबई मनपा तुटीत होती. तेव्हाचे आयुक्त सुबोधकुमार आणि आपल्या लोकांनी ती सशक्त केली', असे ते पुढे म्हणाले.

'कोस्टल रोड विना टोल आपण देतोय. मनपाचा उपक्रम हा त्या ठेवीतून. त्यातील ३०-४०% रक्कम हा कामगारांचा आणि इतर कामांचा. त्यांना मुंबई ही सोन्याची कोंबडी वाटते, त्यांना ती कापायची आहे. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मराठी माणसाची मुंबई आपण त्यांच्या हाती जाऊ देणार नाही. ही कसली बाळासाहेबांची माणसं? कोश्यारींना खर तर हाकलून द्यायला हवे होते. आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्त ही बातमी आली, असे ठाकरे पुढे म्हणाले.

Uddhav Thackeray
Sanjay Raut : संजय राऊतांची शिंदे गटावर जहरी टीका, म्हणाले हे ४० दगड बुडून..,

'महापुरुषांचा अपमान सहन करणारे ही कसले बाळासाहेबांची माणसे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. हे दगडविटांच्या आहेत. दगडाचा उपयोग कोण कोण कस करत हे सगळ्यांना माहिती आहे. आज नाटक आहे आमनेसामने. पुढे सभा घेऊच. आता होऊन जाऊ देऊ आमने सामने, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com